Aryan Khan drug case : आता ड्रग्ज पार्टीप्रकरणात मुंबई पोलिसांची एण्ट्री, तर NCB ने ही तीन राज्यातील अधिकाऱ्यांची फौज मागवली

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने मुंबई-गोवा क्रूझ पार्टीवर 2 ऑक्टोबरला धाड टाकली. त्यावेळी आर्यन खानसह त्याच्या सहकाऱ्यांकडे अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी समीर वानखेडे आणि NCB करत असताना आता मुंबई पोलिसांची एण्ट्री झाली आहे. 

Aryan Khan drug case : आता ड्रग्ज पार्टीप्रकरणात मुंबई पोलिसांची एण्ट्री, तर NCB ने ही तीन राज्यातील अधिकाऱ्यांची फौज मागवली
Shahrukh Khan Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 1:12 PM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान ड्रग्जप्रकरणात अडकला आहे. कोर्टाने आर्यनसह 8 जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने मुंबई-गोवा क्रूझ पार्टीवर 2 ऑक्टोबरला धाड टाकली. त्यावेळी आर्यन खानसह त्याच्या सहकाऱ्यांकडे अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी समीर वानखेडे आणि NCB करत असताना आता मुंबई पोलिसांची एण्ट्री झाली आहे.

मुंबई पोलिसांची एण्ट्री 

क्रूझ शिप पार्टी प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. क्रूझवर पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मुंबई पोलिसांना परवानगीसाठी कोणतेही लेखी पत्र किंवा क्रूजवरील पार्टीबद्दल मुंबई पोलिसांना कोणतीही सूचना दिलेली नव्हती. जहाजाला कोणती परवानगी देण्यात आली याबद्दल मुंबई पोलीस डीजी शिपिंग आणि एमबीपीटीशी बोलणार आहेत. सध्या राज्यात कोव्हिड -19 मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे. कलम 188 चे कोणतेही उल्लंघन झालं आहे का याचाही तपास करण्यात येणार आहे, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

तसेच कलम 144 आहे. त्यामुळे 5 लोकांना एकत्र परवानगी नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते परवानगी घेतली आहे की नाही किंवा कुठल्या एजन्सीजने परवानगी दिली गेली आहे का? कारण त्यात अनेक अशा एजन्सी आहेत ज्यांना परवानगी पाहिजे होती. नियमांमध्ये काही उल्लंघन झालं असेल तर मुंबई पोलीस एफआयआर दाखल करणार आहेत.

मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ पार्टी आयोजित केली होती ती यलो गेट पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येते. त्यांची परवानगी आवश्यक होती. परंतु कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही आणि किंवा कोणतीही सूचना दिल्या नव्हत्या. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोन पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

NCB च्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

एकीकडे मुंबई पोलिसांनी ड्रग्जप्रकरणाच्या केसमध्ये एण्ट्री घेतली असली तरी NCB नेही मोठी तयारी केली आहे. एनसीबीच्या मदतीसाठी अनेक राज्यातून एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरात , मध्य प्रदेश , दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत. मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी जहाजावर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी आहेत. अनेकांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई झोनल ऑफिसमधील अधिकारी संख्येने कमी आहेत. याचमुळे इतर राज्यातून अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

आरोपींना कुटुंबीयांकडून मॅकडॉनल्डचा बर्गर

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड पडल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे लाडकोड अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. आरोपींसाठी कुटुंबीय मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.

क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. एका आरोपीचे नातेवाईक त्याच्यासाठी चक्क मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन आले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं.

आर्यन खान ढसाढसा रडला

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

ड्रग्ज प्रकरणात अटकेनंतरही पालकांकडून पोरांचे लाड, बर्गर घेऊन आई NCB ऑफिसबाहेर

जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.