Happy Birthday Shaan | ‘चांद शिफारीश’ ते ‘चार कदम’, ऐका गायक शानची सुपरहिट गाणी!

| Updated on: Sep 30, 2021 | 10:32 AM

बॉलिवूडच्या प्रतिभावान आणि लोकप्रिय गायकांपैकी एक असणाऱ्या शानचा (Shaan) आज वाढदिवस आहे. शानचे खरे नाव शंतनु मुखर्जी होते, त्याचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी झाला. शानच्या आजोबांचे नाव जहर मुखर्जी असून ते लोकप्रिय गीतकार होते आणि त्यांचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते.

Happy Birthday Shaan | ‘चांद शिफारीश’ ते ‘चार कदम’, ऐका गायक शानची सुपरहिट गाणी!
Shaan
Follow us on

मुंबई : बॉलिवूडच्या प्रतिभावान आणि लोकप्रिय गायकांपैकी एक असणाऱ्या शानचा (Shaan) आज वाढदिवस आहे. शानचे खरे नाव शंतनु मुखर्जी होते, त्याचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी झाला. शानच्या आजोबांचे नाव जहर मुखर्जी असून ते लोकप्रिय गीतकार होते आणि त्यांचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते.

शानने फार लहान वयातच कामाला सुरुवात केली. वयाच्या चौथ्या वर्षी शानने पहिले गाणे गायले. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत तो जिंगल्स गात असे. शान एका मुलाखतीत म्हणाला होता की, जेव्हा मी 5 वर्षांचा होतो, तेव्हा मी बंगाली नर्सरी ऱ्हाईम अल्बम रेकॉर्ड केला होता. 80च्या दशकात शानने अनेक मोठ्या ब्रँडसाठी जिंगल्स गायल्या आहेत.

शानने कधीच विचार केला नव्हता की तो गायक बनेल. तो एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘माझे वडील प्रतिभावान, मेहनती आणि खूप संघर्षशील होते. त्यामुळे मला वाटले की, या करिअरमध्ये स्थिरता नाही. मी नोकरी शोधू लागलो आणि व्यवसायही सुरु केला.’

शानला पुन्हा संगीतात अनेक संधी मिळाल्या आणि त्याने गायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शानने अभिनेता म्हणूनही काम केले, शोला जज केले आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम केले. शान अशा गायकांपैकी एक आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय गायकांसोबत देखील गाणे गायले आहे.

अनेक चित्रपटांमध्ये गायलेली गाणी

शानने ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘हम तुम’, ‘धूम’, ‘दस’, ‘सलाम-नमस्ते’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘डॉन 3’, ‘इडियट्स’, ‘तारे जमनी पर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

तनहा दिल

माय दिल गोज

‘सलाम नमस्ते’ या चित्रपटातील या गाण्यात सैफ अली खान आणि प्रीती झिंटाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे गाणे शानने गायत्री अय्यरसोबत गायले होते.

कुछ कम

प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटातील हे एक दुःखी गाणे आहे. पण त्याला चांगली पसंतीही मिळाली आहे.

चांद सिफारीश

आमिर खान आणि काजोलचे हे गाणे रसिकांसाठी परफेक्ट आहे. शानचे हे गाणे त्याच्या हिट गाण्यांपैकी एक आहे.

जबसे तेरा नैना

रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा डेब्यू चित्रपट ‘सावरिया’ कदाचित चालला नसेल, पण चित्रपटाचे हे गाणे खूप हिट झाले.

ये शोना

‘ता रा रम पम’ या चित्रपटातील हे रोमँटिक गाणे सर्वांचे आवडते आहे. हे गाणे शानने सुनिधी चौहानसोबत गायले आहे.

चार कदम

‘पीके’चे ‘चार कदम’ गाणे हिट ठरले. आजही या गाण्याची क्रेझ रसिकांमध्ये कायम आहे. श्रेया घोषालने शानसोबत या गाण्यात आपला आवाज दिला आहे.

चैन अपको मिला

‘हंगामा’ चित्रपटातील हे गाणे शानने साधना सरगमसोबत गायले आहे. गाणे बऱ्यापैकी रोमँटिक आहे, पण त्याचा व्हिडिओ मजेदार आहे.

वो लडकी है कहां

‘दिल चाहता है’ या चित्रपटातील हे गाणे खूप हिट झाले होते. हे गाणे शानने कविता कृष्णमूर्तीसोबत गायले आहे.

दिल लेके

सलमान खान आणि आयशा टाकिया यांच्या चित्रपटातील हे एक रोमँटिक गाणे आहे. हे गाणे शानने श्रेया घोषालसोबत गायले आहे.

वैयक्तिक जीवन

शानने 2000 मध्ये गर्लफ्रेंड राधिकाशी लग्न केले. दोघांची प्रेमकथा बरीच रोचक आहे. जेव्हा दोघे भेटले तेव्हा राधिका 17 वर्षांची होती आणि शान 24 वर्षांची होती. शान खूप लाजाळू होता. तर एक दिवस दोघेही बीचवर होते आणि शानने धाडसाने राधिकाला प्रपोज केले. त्याने राधिकाला सांगितले, ‘हा महासागर, हा वारा, हे ढग साक्षीदार आहेत. तू माझ्याशी लग्न करशील का?’ राधिकाने ‘हो’ म्हटले आणि मग शान तिच्या पालकांना भेटला. दोघांचे कुटुंब सहमत होते आणि दोघांनी लग्न केले.

हेही वाचा :

कधीकाळी जाहिरातीतून केली होती करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!

Happy Birthday Shaan | वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायनाला सुरुवात, वाचा गायक शानच्या काही खास गोष्टी…