कधीकाळी जाहिरातीतून केली होती करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल टाकण्यापूर्वी आपल्या कारकिर्दीत वेगळ्या गोष्टी केल्या. काहींनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती...

कधीकाळी जाहिरातीतून केली होती करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!
Bollywood Celebs

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल टाकण्यापूर्वी आपल्या कारकिर्दीत वेगळ्या गोष्टी केल्या. काहींनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती आणि काही अभिनेत्री तर नृत्यांगना होत्या. बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत, ज्यांना बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.

आजघडीला अनेक कलाकार आहेत, ज्यांनी दूरदर्शन जाहिरातींद्वारे पदार्पण केले. त्यावेळी त्या स्टार्सना पाहून कोणीही अंदाज लावला नसेल की, एक दिवस हे कलाकार सुपरस्टार होतील.

ऐश्वर्या राय बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 1994मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला. तिचा जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे. 1993 मध्ये ऐश्वर्या राय कोको कोलाच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत आमिर तिच्यासोबत होता.

वरुण धवन

डेव्हिड धवनचा धाकटा मुलगा वरुण धवनने बॉलिवूडमध्ये चांगली सुरुवात केली. वरुण लहान असताना त्याने बॉर्नविटा जाहिरातीत काम केले होते.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आज चित्रपट जगतातील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारते. पण, बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दीपिका पदुकोणने एक मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दीपिकाने प्रथम एक क्लोज अप जाहिरात केली, नंतर तिला साबणाच्या जाहिरातीत मुख्य चेहरा म्हणून कास्ट केले गेले.

सलमान खान

सलमान खानचा बॉलिवूड प्रवास अजिबात सोपा नव्हता. सूरज बडजात्या यांना भेटण्यापूर्वी सलमान खानलाही अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सलमान खानने टीव्हीमध्येही काम केले होते. त्याची पहिला टीव्ही जाहिरात लिम्का सॉफ्ट ड्रिंकची होती.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता, तरीही ती बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाली. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला, अनुष्काने दक्षिण भारतीय टीव्ही जाहिरातीत काम केले, जिथे तिने साबणाचा प्रचार केला होता.

सिद्धार्थ मल्होत्रा

स्टुडंट ऑफ द इयरमध्ये मोठा ब्रेक मिळवण्यापूर्वी मॉडेलिंग करत असे. त्या काळात त्याने पाँड्सची जाहिरात केली होती. या जाहिरातीवरूनच सिद्धार्थ मल्होत्राला ओळख मिळू लागली.

प्रिती झिंटा

बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीने केली होती. त्यावेळी प्रीती झिंटाला पर्क आणि लिरील साबणांच्या जाहिरातींसाठी ओळखले गेले. तिच्या गोंडस चेहऱ्याने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस’च्या चावडीवर गायत्रीने सोनालीला सुनावले खडेबोल

Godavari Official Release Announcement | जितेंद्र जोशी-गौरी नलावडेचा ‘गोदावरी’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI