AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Zeenat Aman | वयाच्या 19व्या वर्षी ‘मिस इंडिया’ बनल्या, पत्रकार म्हणूनही काम केले, वाचा झीनत अमान यांच्याबद्दल…

सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी चित्रपट पडद्यावर असे काम केले, जे त्या काळातील अभिनेत्रींच्या विचारापासूनही दूर होते.

Happy Birthday Zeenat Aman | वयाच्या 19व्या वर्षी ‘मिस इंडिया’ बनल्या, पत्रकार म्हणूनही काम केले, वाचा झीनत अमान यांच्याबद्दल...
Zeenat Aman
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी चित्रपट पडद्यावर असे काम केले, जे त्या काळातील अभिनेत्रींच्या विचारापासूनही दूर होते. चित्रपटांमध्ये एंट्री केल्यानंतर झीनत यांनी महिलांसाठी असलेल्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

झीनत अमान यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबई येथे झाला. त्यांची आई महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती आणि वडील अमानुल्ला खान भोपाळच्या राजघराण्यातील होते. अमानुल्ला खान यांनी इतर लेखकांसह ‘मुघल-ए-आझम’ आणि ‘पाकीजा’ सारख्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. लेखक म्हणून त्यांनी आपले नाव ‘अमान’ ठेवले होते. झीनत अमानचे खरे नाव झीनत खान आहे, परंतु चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी झीनत यांनी त्यांच्या नावासोबत वडिलांचे टोपणनाव जोडले.

भारतासोबतच जर्मन नागरिक!

झीनत अमान यांना सुरुवातीपासूनच अनेक समस्यांनी घेरले होते. त्या खूप लहान असताना त्यांच्या पालकांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला. यानंतर झीनत त्यांच्या आईसोबत राहू लागल्या. वडिलांचे निधन झाले तेव्हा झीनत 13 वर्षांच्या असाव्यात. यानंतर त्यांच्या आईने हेन्झ नावाच्या जर्मन माणसाशी लग्न केले. झीनत आणि तिची आई दोघीही जर्मनीला गेल्या आणि त्यासोबतच दोघांनाही जर्मन नागरिकत्व मिळाले. झीनत यांच्याकडे आता भारताव्यतिरिक्त जर्मनीचे नागरिकत्व आहे.

झीनत अमान यांचे बालपण प्रचंड गडबडीत गेले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झाले. झीनत यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पाचगणी येथे झाले. यानंतर त्या आईसोबत परदेशात गेल्या, त्यानंतर त्यांना लॉस एंजेलिस येथील दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवण्यात आले. मात्र, त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही.

कौटुंबिक समस्या असूनही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती आणि चालीरीती पाहिल्या होत्या. ज्याने त्यांना जग समजू लागले. ग्रॅज्युएशन पूर्ण केले नसतानाही, त्या देशात परतल्या आणि फेमिना मासिकासाठी लिहू लागल्या. एक प्रकारे झीनतने पत्रकार म्हणून पहिली नोकरी सुरू केली होती.

वयाच्या 19व्या वर्षी ‘मिस इंडिया’

फेमिनासारख्या फॅशन मॅगझिनमध्ये काम करताना झीनत अमान यांना स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करायचा होता. येथून त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. झीनत दिसायला सुंदर होत्या, त्यामुळे त्यांना मॉडेलिंगमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, 1970 मध्ये, वयाच्या 19 व्या वर्षी, झीनत यांनी फेमिना मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल या किताब जिंकले. हे विजेतेपद पटकावणाऱ्या झीनत पहिल्या दक्षिण आशियाई महिला ठरल्या. यानंतर झीनत देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकल्या.

देव आनंदच्या चित्रपटातून मिळाली ओळख

झीनत अमान याची चित्रपटांमधील सुरुवातीची कारकीर्द खूप कठीण होती. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांनी ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, ‘हरे रामा हरे कृष्णा’मध्ये देव आनंदसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपला विचार बदलला. तिथून झीनत यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली. यानंतर झीनत अमानने ‘यादों की बारात’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘वॉरंट’, ‘धरम वीर’, ‘छैला बाबू’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले.

हेही वाचा :

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदमांची जोडी, एकाहून एक धम्माल गाण्यांनी सज्ज ‘पांडू’  चित्रपटाचे संगीत प्रकाशित!

रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, तरीही ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...