जेव्हा एका गाण्यामुळे एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज होतात! वाचा ‘छोड दो आँचल’ गाण्याचा किस्सा

| Updated on: Aug 07, 2021 | 9:09 AM

काहीसं नटखट आणि खट्याळ चालीच नि बोलाचं हे गाणं आजही अनेक रसिकांच्या जिभेवर रेंगाळतं. आजही लोकप्रिय असणारं हे गाण मात्र, त्याकाळी एसडी बर्मन यांच्या पसंतीस उतरलं नव्हतं. चला तर, जाणून घेऊया ‘या’ खास गाण्याचा एक किस्सा...

जेव्हा एका गाण्यामुळे एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज होतात! वाचा ‘छोड दो आँचल’ गाण्याचा किस्सा
अभिनेत्री नूतन
Follow us on

मुंबई : संगीत, गाणी हा तसा प्रत्येकाचाच आवडता विषय. आपल्याला जेव्हा एखादं गाणं खूप आवडत तेव्हा आपण आणि आपल्या सगळ्याच भावना त्या गाण्याशी जोडल्या जातात. आजही आपल्या पैकी अनेकांच्या घरात जुन्या अर्थात किशोर कुमार (Kishore Kumar), रफी (Mohammad Rafi), आशा भोसले (Asha Bhosle), लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेल्या गाण्यांची तर मैफिलच रंगते. जुन्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक शब्दांचा उलगडणारा अर्थ. ही गाणी आजही रसिकांच्या मनाला तितकीच भावतात. यातीलच एक गाण आहे ‘छोड दो आँचल ज़माना क्या कहेगा…’

काहीसं नटखट आणि खट्याळ चालीच नि बोलाचं हे गाणं आजही अनेक रसिकांच्या जिभेवर रेंगाळतं. आजही लोकप्रिय असणारं हे गाण मात्र, त्याकाळी एसडी बर्मन यांच्या पसंतीस उतरलं नव्हतं. चला तर, जाणून घेऊया ‘या’ खास गाण्याचा एक किस्सा…

दिग्गजांचा चमू

‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटातील ‘छोड दो आँचल ज़माना क्या कहेगा’ हे गाणं एव्हरग्रीन अभिनेते देव आनंद (Dev Anand) आणि अभिनेत्री नूतन (Nutan) यांच्यावर चित्रित झालं होतं. या गाण्याचे बोल गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचे होते. तर, सचिन देव बर्मन अर्थात एस डी बर्मन (S.D. Burman) यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. सुप्रसिद्ध गायक आणि गायिका अर्थात किशोर कुमार (Kishore Kumar) आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं.

एसडी बर्मन आशा भोसलेंवर नाराज झाले!

जेव्हा हे गाणं पूर्ण तयार झालं, तेव्हा ते सगळ्यांच्याच पसंतीस उतरलं. सगळ्यांनीच या गाण्याच भरपूर कौतुक केलं. पण या सगळ्यात एसडी बर्मन मात्र आशा भोसलेंवर विशेष नाराज झाले होते. ते रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर आशा भोसलेंना म्हणाले की, हे गाण तू अजिबात चांगलं गायली नाहीस. जसं मला हवं होतं, तसं तर तू गाऊच शाली नाहीयेस. हे गाण प्रदर्शित होण्यापूर्वी ते पुन्हा एकदा रेकॉर्ड करून घ्यावं असं मला वाटतं आहे.’

वेळेची मर्यादा आडवी आली…

एसडी बर्मन यांना हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करायचं होतं. पण वेळेची मर्यादा आडवी आली. कमी वेळे अभावी हे गाणं पुन्हा रेकॉर्ड होऊच शकलं नाही. यामुळे तेच गाणं प्रदर्शित करण्यात आलं. मात्र, तरीही हे गाणं तुफान गाजलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. शेवटी जे लोकांना पसंत तेच हिट ठरतं!

(Interesting story behind the song Chhod Do Aanchal Zamana Kya Kahega from movie Paying Guest)

 हेही वाचा :

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ म्हणणार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’, नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!