AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ म्हणणार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’, नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार!

राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘राणा दा’ म्हणणार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’, नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार!
हार्दिक जोशी
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 1:07 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangla) सद्य घडीला ही मालिका ऑफ एअर गेली असली तरी, मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील ‘राणा दा’, ‘पाठक बाई’, ‘नंदिता वहिनी’, ‘गोदाक्का’, ‘बरकत’ ही पात्र खूप लोकप्रिय झाली होती. त्यातही ‘राणा दा-अंजली बाई’ ही जोडी छोट्या पडद्यावर विशेष गाजली. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर सगळेच प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना मिस करत आहेत. मात्र, आता ‘राणा दा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. वाहिनीकडून अद्पाय यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणणार आहे. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मॉडेलिंगमधून करिअरला सुरुवात!

अभिनेता हार्दिक जोशी हा मुळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याच शिक्षण आणि बालपण देखील मुंबईतच गेलं. मात्र, मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याला कोल्हापुरात राहावं लागलं होतं. तब्बल चार ते साडे चार वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलेल्या हार्दिकला कोल्हापूरचा आणि तिथल्या लोकांचा लळा लागला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडेलिंग करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने ‘रंगा पतंगा’ यासरख्या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. तसेच, त्याने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

अभिनय नव्हे, आर्मीत जाण्याची होती इच्छा!

कॉलेजमध्ये असताना हार्दिक मॉडेलिंग करायचा. पण त्यात करिअर करण्याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. त्याला आर्मीत करिअर करायचं होतं. 2011मध्ये त्याची आर्मीत निवडही झाली होती. त्यावेळी चंदीगडमध्ये एसएसबीचं (सशस्त्र सीमा दल) ट्रेनिंगही त्यानं पूर्ण केलं होतं. पण काही कारणामुळे त्याला कॉल आला नाही. मात्र, अजूनही आर्मीत जाण्याची माझी इच्छा आहे, असं हार्दिक म्हणतो. एसएसबीमध्ये निवड न झाल्याने, तो मुंबईला परत आला आणि फोटोशूट केलं. तिथूनच त्याचा मनोरंजन विश्वातला प्रवास सुरु झाला होता. आता पुन्हा एकदा नव्याने तो व्यवसायात पदार्पण करत आहे. अशावेळी त्याने आपल्या चाहत्यांचा पाठींबा मागितला आहे.

(Tujhyat Jeev Rangla Fame Actor Hardeek Joshi to play lead role in Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava)

हेही वाचा :

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील हंगाम्याला भोजपुरी तडका लागणार, ‘या’ अभिनेत्रीची ग्रँड एंट्री होणार!

’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय…’, नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने व्यक्त केल्या मनातील भावना!

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.