‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

राधा आणि हार्दिक यांची मुख्य भूमिका असलेला "डाव" (Daav) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अंकिताच्या नकारात्मक भूमिकेमुळे अभिनेत्री "राधा सागर" चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

'राणादा'ला मिळाली 'अंकिता'ची साथ, नवी जोडी, नवा "डाव"
Radha Sagar, Hardik Joshi

मुंबई : अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये (Aai Kuthe Kay Karte) अंकिताच्या भूमिकेने राधाने घराघरात ओळख मिळवली आहे. राधाच्या जोडीला ‘राणादा’ अर्थात झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangla) मालिकेतून गाजलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) दिसणार आहे. (Aai Kuthe Kay Karte fame Ankita Actress Radha Sagar Marathi Actor Hardeek Joshi to work together in Marathi Movie Daav)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

“आई कुठे…” मालिकेत नकारात्मक भूमिका

राधा आणि हार्दिक यांची मुख्य भूमिका असलेला “डाव” (Daav) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अंकिताच्या नकारात्मक भूमिकेमुळे अभिनेत्री “राधा सागर” चांगलीच लोकप्रिय झाली आहे. डॉ. अभिषेकशी लग्न करुन तिने त्याच्यासह अरुंधती आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाला जेरीस आणलं आहे. खलनायिकेच्या भूमिकेतून छाप पाडणारी राधा आता हिरोईन म्हणून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला राणादा

दुसरीकडे, तुझ्यात जीव रंगला मधील राणाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. राणादाच्या भूमिकेमुळे जवळपास चार वर्ष हार्दिकने प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. राणादाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. डाव या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला. राधा आणि हार्दिकची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.

 

संबंधित बातम्या :

Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!

(Aai Kuthe Kay Karte fame Ankita Actress Radha Sagar Marathi Actor Hardeek Joshi to work together in Marathi Movie Daav)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI