AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Memes: पाकिस्तानी क्रिकेटरला पाहून लाजली उर्वशी रौतेला; ट्विटरवर ऋषभ पंतवरून मीम्सचा पूर

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका फॅन पेजचा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती नसीम शाहकडे पाहून हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

Memes: पाकिस्तानी क्रिकेटरला पाहून लाजली उर्वशी रौतेला; ट्विटरवर ऋषभ पंतवरून मीम्सचा पूर
Rishabh Pant, Urvashi Rautela, and Naseem ShahImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 3:52 PM
Share

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी स्टेडियमवर गेलेली उर्वशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि तिच्यात सोशल मीडियावर झालेल्या बाचाबाचीनंतर ती मॅच पहायला गेली, असं नेटकरी म्हणत आहेत. पण आता पाकिस्तानच्या क्रिकेटरचा (Naseem Shah) व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केल्याने उर्वशीबद्दल ट्विटरवर चर्चांना उधाण आलं आहे. तिच्या या पोस्टमुळे तिला प्रचंड ट्रोलदेखील केलं जातंय.

उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. उर्वशीचं नाव अनेकदा त्याच्याशी जोडलं गेलं. त्यानंतर दोघांकडून सोशल मीडियावर एकमेकांवर वार-पलटवार झाले. उर्वशी आणि ऋषभमधील हे भांडण चर्चेत असतानाच आता सोशल मीडियावर तिचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहशी जोडलं जातंय. याचं कारण खुद्द उर्वशीनेच नेटकऱ्यांना दिलं आहे.

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका फॅन पेजचा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती नसीम शाहकडे पाहून हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

उर्वशीने नसीम शाहचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ऋषभते चाहते नाराज झाले आहेत. चाहते ट्विटरवर नसीम, ​​उर्वशी आणि ऋषभ यांचा लव्ह ट्रँगल दाखवणारे हास्यास्पद मीम्स शेअर करत आहेत आणि उर्वशीला ट्रोल करत आहेत. काहींनी ऋषभचीही खिल्ली उडवली आहे.

उर्वशी ही 28 वर्षांची आहे तर नसीम शाह हा अवघा 19 वर्षांचा आहे. दुसरीकडे ऋषभ पंत हा 24 वर्षांचा आहे. एका युजरने शेअर केलेल्या मीममध्ये उर्वशीच्या वयावरही प्रश्न उपस्थित केला आहे. हा लव्ह अँगल चुकीचा असल्याचं त्यात म्हटलं आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील ‘छोटू भैया’ आणि ‘दीदी’ हे भांडण आता लव्ह ट्रँगलमध्ये बदललं आहे, असंही काही नेटकरी म्हणतायत.

2019 मध्ये ऋषभ पंतने उर्वशीला डेट करण्याच्या चर्चांना फेटाळलं होतं. त्याचसोबत इशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने जाहीर केलं होतं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.