
Sonali Bendre Love Life: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आज सोनाली तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एका काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री तिच्या रिलेशनशिपमुळे तुफान चर्चेत राहिली.
बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना सोनाली ब्रेंद्रे हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. त्याच सेलिब्रिटींमधील एक म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर… शोएब अख्तर याने अनेकदा सोनालीसाठी मनात असलेल्या भावना व्यक्त करुन दाखवल्या. शोएब अख्तर कायम सोनालीचे फोटो पाहत असायता. एवढंच नाही तर, शोएबच्या पर्समध्ये सोनालीचा फोटो देखील असायचा… असं देखील अनेकदा समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, सोनाली हिला भेटण्यासाठी शोएब याने अनेकदा प्रयत्न देखील केले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान त्याने फिक्सर्सना भेटण्याची विनंती केली होती. शोएबही त्याच्या हेतूत यशस्वी झाला. पण दोघांचं नातं काही जमलं नाही.
शोएबचे सोनालीवर इतकं प्रेम होतं की त्याने स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जर सोनाली बेंद्रेने त्याचा प्रस्ताव नाकारला तर तो तिचे अपहरण करेल. असं वक्तव्य शोएब याने विनोदी अंदाजात केलं होतं. सोनाली हिच्यामुळे अभिनेत्याचा संसार मोडणार होता.. असं देखील अनेकदा समोर आलं. पण अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही असं सांगितलं होतं.
अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या नंतर सोनाली बेंद्रे हिने 2002 मध्ये दिग्दर्शक गोल्दी बहल याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. सोनाली कायम पती आणि मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.