लग्नावर खर्च करण्यापेक्षा मी…, वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर यांचं लक्षवेधी वक्तव्य
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर यांचं लक्षवेधी वक्तव्य, संताप व्यक्त करत म्हणाले, 'हुंडा घेणाऱ्या लोकांना....', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा...

Vaishnavi Hagawane Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार, अनेक महागड्या वस्तू दिल्यानंतर देखील वैष्णवी हिने आत्महत्या केली. आता वैष्णवी हिने आत्महत्या केली की, सासरच्यांची तिची हत्या केली? यावर पोलीस चौकशी सध्या सुरु आहे. वैष्णवी प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. यावर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. ‘लग्नात खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर पैसा खर्च करेल…’ असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं आहे.
नाना पाटेकर म्हणाले, ‘हुंडाबळी ही प्रकराची वृत्ती आहे. हुंडा घेणाऱ्या लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल. लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही ही प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आणि संस्काराचा भाग आहे. माध्यापुरतं बोलायचं झालं तर, मी लग्नात खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी हेईल…’
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसं समाजात असतात आणि हे वास्तव नाकारता येत नाही… झाडावर रोग येतो म्हणून झाले वाढवायची नाहीत का? फळे चाखायची नाहीत का? लग्न सोहळे हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे.’
‘प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. हा काय मूर्खपणा सुरु आहे… याची चर्चा करण्यापेक्षा मी काय यावर काय करु शकतो… हा विचार आपण करायला हवा. समाजातील विसंगती आम्ही मांडतो…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकलपट्टी करण्यात आली आहे. प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियाव देखील वैष्णवी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यावर कमेंट करत अनेक जण हगवणे कुटुंबियांवर संताप व्यक्त करत आहेत.
