AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं लग्न पाकिस्तानातच..; Whatsapp चॅटमधून ज्योतीच्या प्रेमसंबंधाविषयी मोठा खुलासा

Jyoti Malhotra News Update: भारतातल्या ज्योती मल्होत्राते पाकिस्तानात प्रेमसंबंध, खासगी Whatsapp चॅटमधून धक्कादायक खुलासा, ती स्वतः म्हणते, 'माझं लग्न पाकिस्तानातच...', सध्या सर्वत्र ज्योती आणि तिच्या प्रेमसंबंधांची चर्चा...

माझं लग्न पाकिस्तानातच..; Whatsapp चॅटमधून ज्योतीच्या प्रेमसंबंधाविषयी मोठा खुलासा
| Updated on: May 21, 2025 | 12:42 PM
Share

Jyoti Malhotra News Update: हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असून तिच्याबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. आता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन आणि आणि एका पाकिस्तानी पुरुषासोबत ज्योतीचे खासगी Whatsapp चॅट समोर आले आहेत. ज्यामध्ये अली हसन, ज्योतीला म्हणतो, ‘जो यार, मेरे दिल से दुआ निकलती है हमेशा की आप खुश रहो… हंसते – खेलते रहो…’ तुझ्या आयुष्यात कधी कोणतं संकट यायला नको… असं अली हसन ज्योतीला म्हणाला. शिवाय ज्योतीने देखील त्याच्या मेसेजवर उत्तर दिलं आहे.

अली हसनच्या मेसेजवर ज्योतीने हसणारा इमोजी पाठवला. पुढे ज्योती म्हणाली, ‘माझं लग्न पाकिस्तानात करा…‘ या चॅटमधून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे ज्योतीचं पाकिस्तानसोबत भावनीक नातं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसन यांच्याशी सतत संपर्कात होती. एवढंच नाही तर, दोघांमध्ये चांगले संबंध होते आणि सतत एकमेकांसोबत बोलत असायचे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीच्या 4 बँक अकाउंटबद्दल माहिती मिळाली आहे. एका बँक अकाउंटमध्ये दुबईहून झालेला व्यवहारही आढळून आला आहे. तपास यंत्रणा आता ज्योतीच्या सर्व बँक खात्यांची कसून तपासणी करत आहे आणि तिच्या खात्यात पैसे कुठून येत होते हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

सांगायचं झालं तर, हरियाणातील हिसार येथील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (ISI) हेरगिरी केल्याबद्दल आणि संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्राला पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी 17 मे रोजी ज्योतीला अटक केली आहे. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. जिथे तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अली हसन याला कशी भेटली ज्योती मल्होत्रा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असं दिसून आलं की, ती 2023 मध्ये कमिशन एजंट्समार्फत व्हिसा मिळवून पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानात तिची भेट उच्चायुक्तालयातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली, ज्याला भारतातून हद्दपार करण्यात आलं.

दानिशशी ओळख झाल्यानंतर त्याने ज्योतीची ओळख अली हसन याच्यासोबत करुन दिली. एवढंच नाही तर, ज्योतीचे सर्व सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1.31 लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स होते. तर तिच्या यूट्यूब चॅनल ‘ट्रॅवल विद जो’वर 3.77 लाख सब्सक्राइबर्स होते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...