महिला – पुरुषांमधील संबंध म्हणजे जगाचा नियम आणि…, अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
महिला - पुरुषांमधील संबंध आणि कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, 'महिला - पुरुषांमधील संबंध म्हणजे जगाचा नियम आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

चांगली भूमिका हवी असेल तर, तडजोड करावी लागले… आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये त्यांना आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. आता ‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनू अग्रवाल हिने देखील कास्टिंग काऊच बद्दल मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, हिंदी सिनेविश्वात कास्टिंग काऊचच आता एक चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये निर्माते, दिग्दर्शक चांगल्या भूमिकेच्या बदल्यात नव्या अभिनेत्रींकडून शारीरिक संबंधांची मागणी केली.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनू अग्रवाल म्हणाली, ‘मी कधीच कास्टिंग काऊच सारख्या परिस्थितीचा सामना केला नाही. आताच्या काळात कास्टिंग काऊच कुठे नाही? बँकमध्ये नाहीये कास्टिंग काऊच?’ आपण का देखावा करतो कळत नाही… असं म्हणत अभिनेत्रीने अनेक प्रश्न देखील उपस्थित केलं.
पुढे अनू म्हणाली, ‘कॉर्पोरेट हाउसेसमध्ये नाहीये कास्टिंग काउच… आज प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काउच आहे. जेव्हा आयुष्य सुरु झालं आहे, तेव्हापासून पुरुष आणि महिला आहे. जे एकत्र येतात आणि हे प्रत्येकाला हवं असतं… हाच जगाचा नियम आणि इतिहास आहे.
View this post on Instagram
‘हे वाईट आहे पण यामध्ये काय वाईट आहे? तुम्ही याची निर्मिती केली आहे का. तर यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय? कास्टिंग काऊच बद्दल एवढी चर्चा का होते?’ असा प्रश्न देखील अनूने यावेळी उपस्थित केला.
अनू अग्रवाल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.अनू अग्रवाल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आशिकी’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने ‘गदब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण कार अपघातानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले. 1998 मध्ये झालेल्या गंभीर अपघातापूर्वीच अनूने संन्यास स्वीकारला होता.
अनू अग्रवाल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.