सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडचणी वाढलेल्या असतानाच जॅकलिन फर्नांडिस पोहचली या देवीच्या दर्शनाला

या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडचणी वाढलेल्या असतानाच जॅकलिन फर्नांडिस पोहचली या देवीच्या दर्शनाला
| Updated on: Jan 04, 2023 | 9:57 PM

मुंबई : जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिचे पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले आहे. ईडीने यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस हिची याच प्रकरणात अनेकदा चाैकशी केली आहे. इतकेच नाही तर जॅकलिनचा पासपोर्टही जप्त करण्यात आलाय. ईडीने काही दिवसांपूर्वी कोर्टामध्ये सांगितले होते की, जॅकलिन फर्नांडिस ही एक परदेशी नागरिक आहे. आता तर ती परदेशात गेली तर ती भारतामध्ये परत येण्याची शक्यता फार कमी आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिच्याबाबत ईडीने असेही म्हटले होते की, परदेशात जॅकलिन आपले करिअर तयार करू शकते. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस हिची महत्वाची भूमिका आहे. यामुळे तिला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

जॅकलिन फर्नांडिस हिच्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला अत्यंत महागडे गिफ्ट देखील दिल्याचे सांगण्यात येतंय.

जॅकलिन फर्नांडिस हिने कोर्टाकडे आपली आई आजारी असल्याने विदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नाव आल्याने जॅकलिनचा चाहता वर्गही कमी झालाय.

आयुष्यात इतक्या सर्व अडचणी सुरू असताना आता जॅकलिन फर्नांडिस थेट वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहचलीये. 4 जानेवारी म्हणजे आजच जॅकलिन फर्नांडिस हिने वैष्णो देवीचे दर्शन घेतले आहे.

जॅकलिन फर्नांडिस हिचे वैष्णो देवीच्या मंदिरातील काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जॅकलिन ही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. काही चाहते जॅकलिनसोबत सेल्फी घेताना देखील दिसत आहेत.