AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुनिशा शर्मा हिच्या वाढदिवसानिमित्त शीजान खान याच्या बहिणीने शेअर केली भावनिक पोस्ट, मेरा बच्चा…

आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवस अगोदर तुनिशा आणि शीजान यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते.

तुनिशा शर्मा हिच्या वाढदिवसानिमित्त शीजान खान याच्या बहिणीने शेअर केली भावनिक पोस्ट, मेरा बच्चा...
| Updated on: Jan 04, 2023 | 9:04 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दिवंगत तुनिशा शर्मा हिचा आज 21 वा वाढदिवस आहे. तुनिशाने अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या 24 डिसेंबरला केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शीजान खान आणि तुनिशा शर्मा हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवस अगोदर तुनिशा आणि शीजान यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदर तुनिशा आणि शीजान खान यांच्यामध्ये बोलणे देखील झाल्याचे सांगितले जातंय.

तुनिशा हिने मालिकेच्या सेटवरील शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला. ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा शर्मा ही तणावात असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे. तुनिशाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने अगोदरच तयारी देखील केली होती.

शीजान खान आणि तुनिशा रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तुनिशा ही शीजान खान याच्या कुटुंबालाच आपले कुटुंब मानत होती. शीजान खान याच्या बहिणी आणि त्याच्या आईसोबत देखील तुनिशाचे एकदम चांगले रिलेशन होते.

तुनिशाला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी शीजान खान याची बहीण फलक नाज हिने अगोदच प्लनिंग केले होते. आज तुनिशाच्या वाढदिवसानिमित्त फलक नाज हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये.

View this post on Instagram

A post shared by Falaq Naazz (@falaqnaazz)

फलक नाज हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, टून्नु माझे लेकरू… मी कधीच विचार केला नव्हता की, मला तुला असे विश करावे लागले…तुलाही माहिती होते, अप्पीने प्लाॅन केला होता तुला सरप्राईज देण्यासाठी…

मला आजच्या दिवशी तुला परीच्या कपड्यांमध्ये बघायचे होते आणि तुझा मेकअप करायचा होता. तुला माहिती आहे, माझ्यासाठी टून्नु किती महत्वाची आहे…माझा दिल तुटला आहे…इतका जास्त त्रास कधीच यापूर्वी झाला नव्हता.

तू गेल्यानंतर खूप जास्त त्रास होतोय…मला खरोखरच कळत नाही की मी कोणासाठी प्रार्थना करू…आयुष्य एका अत्यंत वाईट टप्प्यामध्ये आहे…कधीही न पाहिलेले अश्रू, झोप न येणे रात्री…हे सर्व तू पाहात आहेस…

मला हे माहिती आहे, तू माझ्या आसपासच आहेस…मी तुला महसूस करू शकते…आम्ही तुला प्रत्येक दिवशी मिस करतो. शेवटी फलक नाज हिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे मेरा बच्चा…माझी नन्ही जान…आता शीजान खान याच्या बहिणीची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.