चक्क ‘केआरके’ने मागितली शाहरुख खान याची माफी, वाचा नेमकं काय घडलं?

बाॅलिवूड चित्रपटांवरही अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन केआरके टीका करतो.

चक्क केआरकेने मागितली शाहरुख खान याची माफी, वाचा नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 03, 2022 | 12:34 PM

मुंबई : कमाल आर खान आणि वाद हे समीकरण फार पूर्वीपासून सुरू आहे. बॉलिवूड इंडस्ट्री केआरकेच्या कायमच निशाण्यावर असते. सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेकांवर केआरकेने टीका केलीये. बाॅलिवूड चित्रपटांवरही अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन केआरके टीका करतो. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबद्दल नुकताच केआरकेने एक ट्विट केले आहे. मात्र, कमाल आर खानचे हे ट्विट पाहून अनेकांना मोठा धक्काच बसलाय.

कमाल आर खानने आपल्या ट्विटमध्ये चक्क शाहरुख खानची माफी मागितली आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाई जान शाहरुख खान माझ्यामुळे तुमचे मन दुखावले असले तर खरोखरच साॅरी…आता पठाणला माझा पूर्ण पाठिंबा आहे…ऑल द बेस्ट…नेहमी सर्वांवर टीका करणारा कमाल आर खान यावेळी माफी कसा मागतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

केआरकेचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. कमाल आर खानच्या या ट्विटवर युजर्स आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की, तुम्ही पलटी कशी मारली…नेहमी बाॅलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्या कमाल आर खानने नेमकी कोणत्या गोष्टीमुळे आता मवाळ भूमिका घेतली याची चर्चा रंगत आहे.