AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, कंगना राणावतने रामदेव बाबांना झिडकारलं

अभिनेत्री कंगना राणावतने रामदेव बाबांना त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. रामदेव बाबांनी तिच्या शिक्षणावर, तारुण्यावर आणि 'गटर जनरेशन' विधानावर भाष्य केले होते. कंगनाने त्यांना 'माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका' असे सुनावले, तसेच आपल्या चारित्र्याचा बचाव करत रामदेव बाबांच्या कथित फ्रॉड दाव्यांवर बोट ठेवले.

माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, कंगना राणावतने रामदेव बाबांना झिडकारलं
kangana ranautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2026 | 6:29 PM
Share

अभिनेत्री कंगना राणावत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी तिने जंतरमंतरवरील आंदोलकांना गटर जनरेशन म्हणून वाद ओढवून घेतला होता. आता तिने थेट रामदेव बाबांशी पंगा घेतला आहे. रामदेव बाबांनी कंगना राणावतचं शिक्षण काढलं होतं. तिचं बालपण, तारूण्य आणि तिच्या आधीच्या कारनाम्यांविषयी भाष्य केलं होतं. रामदेव बाबांची ही टीका कंगनाच्या जिव्हारी लागली असून तिने थेट रामदेव बाबांना झिडकारलं आहे. माझं तारुण्य वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, अशा शब्दात तिने रामदेव बाबांना फटकारलं आहे.

कंगना राणावतने पोस्ट करून रामदेव बाबांना फटकारलं आहे. बाबाजी, तुम्ही माझी जवानी वा बेडरूमबाबतची स्वप्ने पाहू नका. कोणीही केवळ अफवा आणि गॉसिपच्या आधारेच अंदाज लावू शकतो. कमीत कमी मला खोट्या किंवा फ्रॉड मेडिकल दाव्यांवर कोर्टाने झापलेलं नाही. हे वास्तवावर आधारीत आहे. गॉसिपवर नाही. त्यामुळे मला कॅरेक्टरचं ज्ञान पाजळू नका. तुमच्या पेक्षा कितीतरी पटीने माझं कॅरेक्टर चांगलं आहे. माझा कोणताही फ्रॉड समोर आलेला नाही, असा हल्लाच कंगनाने चढवला आहे.

कंगना काय म्हणाली होती?

कंगनाने जेनजी आंदोलनानंतर पोस्ट केली होती. ज्या महिला स्वतंत्रपणे करिअर करतात, त्या महिलांच्या आयुष्याची नकल करणं तरुण हिंदू महिलांसाठी लज्जास्पद आहे. कोणत्याही कमाई शिवाय त्यांना स्वातंत्र्य हवं आहे. ज्या महिला स्वतंत्र असतात, त्या बंडखोर निर्णय घेतात. त्यांची मते बोल्ड असतात. त्यांचं करिअर असतं. आपल्या कृतीची त्या स्वत: जबाबदारी घेतात. त्या आपले आईवडील आणि कुटुंबाच्या जीवावर हे करत नाहीत. आता एक नवीन जनरेशन आली आहे. कथित पाश्चिमात्यकरण झालेल्या भारतीय महिलांची. मी या जनरेशनला गटर जनरेशन म्हणते. यातील तरुणीना शिक्षणात बऱ्या आहेत, ना दिसायला सुंदर. त्या इतक्या भ्रष्ट झाल्या आहेत की त्या साध्या गृहिणीही होऊ शकत नाही. त्यांच्याकडे काहीच नाहीये. त्या दारू, ड्रग्स आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याला अभिमानाने मिरवत असतात, असं कंगनाने म्हटलं होतं.

रामदेव यांना काय म्हणायचे होते?

कंगनाच्या या विधानावरच रामदेव बाबांची प्रतिक्रिया आली होती. कंगनाचं शिक्षण काय आहे? तिचं तारुण्य आणि बालपण कसं गेलं? तिचे जुने कारनामे कसे होते? मला त्याबाबत बोलायचं नाहीये. कुणालाही अशा पद्धतीने गटर म्हणणं हे डोकं फिरल्याचं लक्षण आहे, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

दरम्यान, कंगना राणावत भारत भाग्य विधाता या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने नर्सची भूमिका निभावली होती. या सिनेमाला चांगला रिव्ह्यू मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमाच चांगली करामत करू शकला नाही. हा सिनेमा ओटिटिवर स्ट्रीम होत आहे. आता कंगना क्वीन-2 मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत.

Follow Us
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी