यांचं नेमकं चाललंय तरी काय? किरण राव-आमिर खानच ‘वेडिंग फोटोसेशन’ पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न!

अनेक बॉलिवूड जोडप्यांनी त्यांचे लग्नबंधन मोडले आहे. नातं तुटल्यानंतर जोडप्यांना एकमेकांचा चेहरा पाहणे देखील आवडत नाही. परंतु, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कदाचित या सर्वांत वेगळा आहे.

यांचं नेमकं चाललंय तरी काय? किरण राव-आमिर खानच ‘वेडिंग फोटोसेशन’ पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न!
Kiran-Aamir

मुंबई : अनेक बॉलिवूड जोडप्यांनी त्यांचे लग्नबंधन मोडले आहे. नातं तुटल्यानंतर जोडप्यांना एकमेकांचा चेहरा पाहणे देखील आवडत नाही. परंतु, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कदाचित या सर्वांत वेगळा आहे. त्याच्या पहिल्या पत्नीसोबतही त्याचे मैत्रीचे नाते आहे, तर आता दुसरी पत्नी किरण रावला (Kiran Rao)घटस्फोट दिल्यानंतरही हे जोडपे अनेकदा एकत्र एका ठिकाणी उपस्थित राहून चर्चेत असते आणि यावेळीही असेच काहीसे घडले आहे, जे जगभर चर्चेत आले आहे.

एका रिपोर्टनुसार, दोघेही एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते. असे सांगितले जात आहे की, त्यांच्या या मित्राने दोघांनाही वेगळी आमंत्रणे दिली होती आणि हे देखील अनपेक्षित होते की, दोघे एकत्र या लग्नात सहभागी होतील. परंतु, जेव्हा दोघे एकत्र पोहोचले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याच वेळी, दोघांनी एकत्र फोटो देखील क्लिक केले आणि दोघांमधील मैत्रीचा बंध देखील दर्शवला, जो सहसा घटस्फोटानंतर इतर जोडप्यांमध्ये दिसत नाही. आमिर आणि किरणचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

जुलै 2021मध्ये घेतला घटस्फोट

आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आमिर खान आणि किरण राव यांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची बाब चाहत्यांसोबत शेअर केली होती. हे वृत्त ऐकून सर्वांना धक्का बसला होता.

घटस्फोटानंतर लडाखमध्ये दिसली जोडी

केवळ एका मित्राच्या लग्नातच नाही, तर घटस्फोटानंतरही हे जोडपे अनेकवेळा एकत्र दिसल्याने चर्चेत आले होते. घटस्फोटाच्या घोषणेनंतर केवळ तीन ते चार दिवसांनीच दोघेही व्हिडीओ कॉलमध्ये एकमेकांचे हात धरताना दिसले. यानंतर, लडाखमधून दोघांच्या धमाल फोटोंनी सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

किरण राव आणि आमिर खान यांनी डिसेंबर 2005 मध्ये लग्न केले होते. आमिरने 2002मध्ये पहिली पत्नी रीना दत्ता हिला घटस्फोट दिला होता. आमिर खान बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.

नुकतेच ही जोडी आगामी चित्रपट ‘लालसिंह चड्ढा’च्या शूटिंगसाठी एकत्र होती, असे सांगण्यात आले आहे. दोघांनी तिथे त्यांचा मुलगा आझाद सोबत खूप मजा केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लडाखहून परतताना, आमिर आणि किरणने विमानतळावर एकत्र पापाराझीसाठी फोटो पोज दिल्या आणि काही वेळानंतर हे जोडपे त्यांच्या मुलासोबत लंच डेटला गेले.

हेही वाचा :

Shah Rukh Khan | सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘#BoycottShahRukhKhan’, नेमकं कारण तरी काय?

Sonu Sood | आयकर विभाग अधिकारी पुन्हा सोनू सूदच्या घरी, आधीही 20 तास झाडाझडती

‘मन उडू उडू झालं’च्या शीर्षक गीतावर मुंबईच्या रिक्षा चालकांनी धरला ताल, सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI