AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Ranbir Wedding | 2022च्या शेवटापर्यंत आलिया-रणबीर लग्न करतील, 2037पर्यंत घटस्फोट घेतील!

अभिनेता आणि कथित समीक्षक कमल राशिद खान (KRK) नेहमीच त्याच्या बेधडक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. अशा लोकांपैकी केआरकेचे एक नाव आहे, जो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतो.

Alia Ranbir Wedding | 2022च्या शेवटापर्यंत आलिया-रणबीर लग्न करतील, 2037पर्यंत घटस्फोट घेतील!
Ranbir-Alia
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 14, 2021 | 10:29 AM
Share

मुंबई : अभिनेता आणि कथित समीक्षक कमल राशिद खान (KRK) नेहमीच त्याच्या बेधडक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. अशा लोकांपैकी केआरकेचे एक नाव आहे, जो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतो. अशा परिस्थितीत यावेळी केआरकेने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाविषयी ट्विट केले आहे.

या ट्विट नंतर केआरके पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या आधीही त्याने सलमान खानच्या ‘राधे’ विषयी ट्विट करत वाद ओढवून घेतला होता. यानंतर त्याने मिका सिंगशी देखील पंगा घेतला होता.

केआरकेने वर्तवले भविष्य

वास्तविक केआरकेने त्याच्या ट्विटरवर एक भविष्यवाणी पोस्ट केली आहे.  केआरकेने त्यांच्या ट्विटमध्ये बर्‍याच गोष्टी लिहिल्या आहेत. अशा स्थितीत केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी भविष्यवाणी केली आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2022च्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण, रणबीर कपूर लग्नाच्या अवघ्या 15 वर्षांतच आलियाशी घटस्फोट घेईल. म्हणजेच केआरकेच्या म्हणण्यानुसार,  2037 पूर्वी रणबीर आलियाशी घटस्फोट घेईल.

पाहा केआरकेचे ट्विट

केआरके ट्रोल

सोशल मीडियावर केआररके आलिया-रणबीरच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या अंदाजाबद्दल बर्‍यापैकी ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर केआरकेला ट्रोल केले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तो बर्‍याच वेळा ट्रोल झाला आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार जोडी

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट बर्‍याच वेळा पुढे ढकलला गेला आहे. चित्रपटाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

(KRK predict Alia Ranbir Wedding and their divorce get trolled on social media)

हेही वाचा :

Throwback | ‘मला मृत्यूचं भय वाटत नाही पण..’, जेव्हा सुशांत त्याच्या भीतीविषयी बोलतो…

Devmanus | ‘देवमाणूस’मध्ये नवी ठसकेबाज एंट्री, ‘या’ व्यक्तीला पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ! पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री…

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी