AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Throwback | ‘मला मृत्यूचं भय वाटत नाही पण..’, जेव्हा सुशांत त्याच्या भीतीविषयी बोलतो…

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांने या जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह आणि कोट्यावधी चाहते दुःखा झाले होते. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. दररोज त्याची आठवण म्हणून सुशांतचे चाहते त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर करत असतात.

Throwback | ‘मला मृत्यूचं भय वाटत नाही पण..’, जेव्हा सुशांत त्याच्या भीतीविषयी बोलतो...
सुशांत सिंह राजपूत
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांने या जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबासह आणि कोट्यावधी चाहते दुःखा झाले होते. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. दररोज त्याची आठवण म्हणून सुशांतचे चाहते त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर करत असतात.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण सुशांत सिंह त्याच्या भीतीबद्दल बोलत असल्याचे पाहू शकतो. त्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटते ते तो या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

पाहा व्हिडीओ :

हा व्हिडीओ सुशांत सिंह राजपूत यांनी चित्रपट समीक्षक व व्यापार विश्लेषक कोमल नहता यांना दिलेल्या मुलाखतीचा आहे. कोमल नहता सुशांतला विचारतात की, आयुष्यात कशाचीही भीती वाटत नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना सुशांत म्हणतो, ‘कदाचित मृत्यू’. कारण जेव्हा मी तीन तासांनंतर उठतो, तेव्हा मी कोण आहे हे मला कळत नाही. आणि मी कोण आहे हे मला माहित नसणे, ही एक भीतीदायक गोष्ट आहे. कदाचित आपण जेव्हा मरणार तेव्हा देखील हेच असेच घडते.

सुशांत सिंह राजपूत यांच्या आकस्मिक निधनानंतर चित्रपटसृष्टीत एक आतले आणि बाहेरचे असा वादविवाद सुरू होता, जो अजूनही चालू आहे. एकीकडे मुंबई पोलिस सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या म्हणत होते. तर, दुसरीकडे अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी याला एक हत्या म्हटली आहे. सुशांतची कथित मैत्रीण रिया चक्रवर्ती यांनी अभिनेत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. ही बाब सध्या सीबीआयकडे असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

रिया चक्रवर्तीशी संबंधित अनेकांनी असा दावा केला होता की, सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि तो त्यासाठी औषधे घेत होता. तथापि या प्रकरणात ड्रग्स अँगल चव्हाट्यावर आला, तेव्हा रिया चक्रवर्ती यांचे म्हणणे फोल असल्याचे दिसून आले. ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली, त्यानंतर काही अहवालांमध्ये दावा केला गेला की, रिया सुशांतला अंमली पदार्थ देत असे. सध्या रिया या प्रकरणात जामिनावर बाहेर असून, एनसीबी आणि सीबीआय दोघेही सुशांतच्या मृत्यूचे गूढ सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

(When Sushant Singh Rajput talk about his fear Throwback video)

हेही वाचा :

Good News | ‘रोडीज’ फेम रणविजय सिंघा पुन्हा एकदा झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केला आनंद!

First Look | रश्मिकासोबतच्या ‘गुडबाय’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लूक सोशल मीडियावर चर्चेत!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.