हृतिक रोशनच्या चाहत्यांना थिएटरमध्ये लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन चित्रपट पाहिला गेल्यावर मिळणार मोठे सरप्राईज

रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, 'लाल सिंग चड्ढा' आणि 'रक्षाबंधन'सोबत हृतिक-सैफच्या चित्रपटाचा टीझर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, 'विक्रम वेदा' चा टीझर देखील सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्यापूर्वी ऑनलाइन प्रदर्शित केला जाईल.

हृतिक रोशनच्या चाहत्यांना थिएटरमध्ये लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन चित्रपट पाहिला गेल्यावर मिळणार मोठे सरप्राईज
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 12:09 PM

मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्याशी टक्कर देण्यासाठी अक्षय कुमारही त्याच्या चित्रपटासह (Movie) सज्ज झाला आहे. आमिरच्या चित्रपटासोबत त्याचा आनंद एल रायसोबतचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित (Displayed) होणार आहे. रक्षाबंधन आणि ‘लाल सिंह चड्ढा’ या दोघांमध्ये नेमका कोणता चित्रपट हिट ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आता दोन्ही चित्रपटांच्या रिव्ह्यूची प्रतीक्षा आहे.

हृतिक रोशनचा विक्रम वेदा 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेदा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील दोन्ही स्टार्सच्या फर्स्ट लूकशिवाय कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार म्हटले आहे की, जेव्हा प्रेक्षक दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी पोहोचतील तेव्हा विक्रम वेदाचे टीझर प्ले करण्यास सांगण्यात आले आहे. ‘विक्रम वेदा’ हा 2022 मधील सर्वात रोमांचक चित्रपटांपैकी एक आहे.

या दोन चित्रपटांच्या अगोदर टीझर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’सोबत हृतिक-सैफच्या चित्रपटाचा टीझर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, ‘विक्रम वेदा’ चा टीझर देखील सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्यापूर्वी ऑनलाइन प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचा टीझर 9 किंवा 10 ऑगस्ट रोजी इंटरनेटवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, सैफ अली खान यांच्यासह राधिका आपटे, रोहित सराफ आणि शरीब हाश्मी यांच्याही भूमिका आहेत.