Lagaan Reunion : ‘लगान’ला 21 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमिर खानने रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते, इरफान पठाणही सामील

आमिर खान 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे. आमिर खान लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'टॉम हँक स्टारर 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे.

Lagaan Reunion : 'लगान'ला 21 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमिर खानने रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते, इरफान पठाणही सामील
लगान रियुनियन
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:59 AM

आमिर खान (Aamir khan)आणि त्याच्या ‘लगान’ (Lagaan) चित्रपटाच्या टीमने चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रियुनियन पार्टी (Reunion Party) केली. ही पार्टी आमिरच्या मुंबईतील घरी करण्यात आली.आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने या रियुनियनच्या काही व्हिडिओची झलक शेअर केली. ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित सर्व लोक आमिरच्या घरात मस्त खाताना, गप्पा मारताना दिसत आहेत एकूणच म्हणू शकतो की ते एंजॉय करत आहेत. लगान चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केला होता जो 15 जून 2001 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

आमिरच्या घरी ‘लगान’ रियुनियन पार्टी

शुक्रवारी आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने हा व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये प्रत्येकजण सेलिब्रेशन मूड मध्ये दिसतोय #21YearsOfLagaan या हॅशटॅगसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हिडिओ क्लिपमध्ये आमिर खान, आशुतोष गोवारीकर, यशपाल शर्मा, अखिलेंद्र मिश्रा, राजेंद्रनाथ झुत्शी आणि इतर अनेक कलाकार एकमेकांसोबत दिसत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि राकेश चोप्रा देखील या सेलिब्रेशनचा एक भाग होते. शंकर पांडे, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत आणि अमीन गाझी हे देखील या गेट-टूगेदरचा भाग होते.

इरफान खानने याला एक सुंदर संध्याकाळ म्हटलं आहे

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना इरफान खान म्हणाला, ‘किती सुंदर संध्याकाळ आहे.’ एका चाहत्याने या व्हिडिओवर लिहिले, ‘खूप सुंदर.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘इतक्या वर्षांनी भेटण्याची किती सुंदर गोष्ट आहे, किती एंजाय केलं… Love From Turkiye..’ दुसर्‍या चाहत्याने लिहिले की, ‘इरफान पठाण लगान कुटुंबासह!!! किती छान रियूनियन.’

तुमच्या माहितीसाठी सांगतो की 15 जून 2001 रोजी ग्रेसी सिंह ‘लगान’ चित्रपटात आमिर खानसोबत दिसली होती. त्याच्याशिवाय ब्रिटिश अभिनेत्री पॉल ब्लॅकथॉर्नही दिसली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा श्रेणीतील 74 व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या श्रेणीत नामांकन मिळालेला हा तिसरा चित्रपट होता. याआधी 1957 मध्ये ‘मदर इंडिया’ आणि 1988 मध्ये ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट आला होता.

आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये दिसणार आहे

आमिर खान लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘टॉम हँक स्टारर ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.