AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं गाणं ऐन भरात असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, पण पुरावा नव्हता!

Lata Mangeshkar :  लता मंगेशकर… असा आवाज ज्या आवाजाचा परमेश्वरही फॅन असेल. लतादीदी आज इहलोकीचा प्रवास संपवून जग सोडून निघून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताने रत्न गमावल्याची भावना आज प्रत्येकजण व्यक्त करत आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या चाळीशीत त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, ही गोष्ट […]

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं गाणं ऐन भरात असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, पण पुरावा नव्हता!
भारतरत्न लता मंगेशकर
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 06, 2022 | 12:40 PM
Share

Lata Mangeshkar :  लता मंगेशकर… असा आवाज ज्या आवाजाचा परमेश्वरही फॅन असेल. लतादीदी आज इहलोकीचा प्रवास संपवून जग सोडून निघून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानंतर अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारताने रत्न गमावल्याची भावना आज प्रत्येकजण व्यक्त करत आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या चाळीशीत त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, ही गोष्ट आज पुन्हा एकदा चर्चिली जातेय. याच विषप्रयोगाबद्दल स्वत: लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कुणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती, असं त्या म्हणाल्या होत्या.

लतादिदींचं गाणं भारतभरात पोहोचू लागलं होतं. बॉलिवूडला त्यांची चांगलीच ओळख होऊ लागलं होतं. सुरुवातीची त्यांची गाणी हिट ठरली. प्रत्येकाच्या ओठावर त्यांची गाणी रुंजी घालायला लागली. संगीतात लता पर्व सुरु झाल्यानंतर कुणाचीतरी दृष्ट लागली. वर्ष होतं 1963…. याच वर्षी लतादीदींवर विषप्रयोग झाला. याबद्दल बोलताना लतादिदी म्हणतात, ‘ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल फारसं बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती.

“विषप्रयोगादिवशी मी झोपून होते. त्यावेळी मला भयंकर अशक्तपणा होता. मी इतकी घाबरली होती की मला उठून चालताही येत नव्हती. चालेल की नाही, याची शाश्वतीही नव्हती. लता मंगेशकर यांची तब्येत खालावली होती. काही दिवस गाणं बंद होतं. मग हलक्या आवाजात चर्चा सुरु झाली आता त्या कधीच गाणार नाहीत. पण शेवटी दीदीच त्या… त्या पुन्हा उठून उभा राहिल्या..!

लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, “आमचे फॅमिली डॉक्टर आर.पी. कपूर होते. त्यांनी त्या काळात माझी खूपच काळजी घेतली. खरंतर त्यांच्यामुळे मी लवकर बरी झाले. विषप्रयोग झाल्यानंतरचे पुढचे 3 दिवस लता मंगेशकर पूर्णत: बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानंतर दीदी हळूहळू यातून सावरल्या.

संबंधित बातम्या

RIP Lata Mangeshkar : ‘मेरी आवाजही पहचान है…’, लतादिदींची ओळख असलेली 10 अजरामर गाणी

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडे, पण आपण ‘क्या कमाल कि गाती है’ असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी