Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liger promotion : लायगरच्या प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा, अनन्या पांडे पोहचले पुण्यात, मॉलमधील गर्दीत चाहत्यांच्या गराड्यात अडकले

लायगर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाबद्दल क्रेझ वाढतोय. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे लायगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात काल पोहचले.

Liger promotion : लायगरच्या प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा, अनन्या पांडे पोहचले पुण्यात, मॉलमधील गर्दीत चाहत्यांच्या गराड्यात अडकले
लायगरच्या प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा, अनन्या पांडे पोहचले पुण्यातImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 9:19 PM

पुणे : लायगर चित्रपट सध्या चर्चेत आहे. वेगवेगळ्या शहरात प्रमोशनसाठी विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे जात आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय  हे बिहारला गेले होते. त्यानंतर पुण्यातील लायगरच्या प्रमोशनचा व्हिडीओही व्हायरल झाला. लायगर प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे काल पुण्यातील मॉलमध्ये गेले होते. त्याठिकाणी चारही बाजूनं ते फसले. शेकडो चाहत्यांनी त्यांना चांगलाच गराडा घातला. विजय आणि अनन्याला भेटण्यासाठी गर्दीनं हिंसक वळण घेतलं होतं. लायगरच्या माध्यमातून विजय देवरकोंडानं बॉलिवूडमध्ये (Bollywood) एंट्री केली. करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शननं (Dharma Productions) लायगर चित्रपटाची निर्मिती केलीय.

नेमकं काय घडलं?

लायगर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाबद्दल क्रेझ वाढतोय. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे लायगर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात काल पोहचले. चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. मॉसच्या वर-खाली विजय आणि अनन्याचे फोटो काढण्यासाठी चाहते सरसावले. चाहत्यांनी विजय आणि अनन्याला चारही बाजूनं घेरलं होतं. आपल्या आवडत्या हिरो, हिरोईनसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. विजय देवरकोंडानं लाल रंगाची टी शर्ट परिधान केली आहे. निळ्या रंगाच्या जीन्सखाली काळ्या रंगाचे जोडे वापरले आहेत. अनन्यानं रंगीबेरंगी टॉप वापरला आहे.

प्रमोशनसाठी पाटण्यातही गेले होते विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिहारला गेले होते. त्यांनी पाटण्यात लायगरचे प्रमोशन केले. त्यावेळी त्यांनी भोजपुरी क्वीन अक्षरा सिंहची भेट घेतली. एवढंच नाही तर भोजपुरी भाषेत युपी, बिहारमधील चाहत्यांना आय लव्ह यू म्हटलं. त्याच्या भोजपुरी बोलण्याचं कौतुक करण्यात आलं. लायगरमधून विजयनं आपल्या बॉलिवूड चित्रपटाची सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे निर्देशक पुरी जगन्नाथ आहेत. चित्रपटात माईक टायसन आणि राम्या कृष्णनही दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची उत्सुकता आहे. लवकरचं ते हैदराबाद, चंदीगड आणि इतर ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भेट देणार आहेत.

हे सुद्धा वाचा

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.