AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh : रणवीर सिंगचं वादग्रस्त फोटो शूट प्रकरण, पोलीस नोटीस घेऊन पोहोचले दारावर, लवकच चौकशी होणार

रणवीर सिंगला 22 ऑगस्टला चेंबूर पोलिसात हजर राहावे लागेल, असे नोटीसमध्ये लिहिले आहे. रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, आयटी कायद्याच्या कलम 67अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ranveer Singh : रणवीर सिंगचं वादग्रस्त फोटो शूट प्रकरण, पोलीस नोटीस घेऊन पोहोचले दारावर, लवकच चौकशी होणार
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2022 | 7:38 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगचे (Ranveer Singh Nude Photoshoot) न्यूड फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. ज्यावरून रणवीरही वाद विवादांनी घेरला होता. एका व्यक्तीने तर रणवीर सिंगविरोधात एफआयआरही (Mumbai Police) दाखल केला होता. रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट पाहून महिलांच्या मनात लाजीरवाणी भावना निर्माण होईल, असे तो म्हणाला होता. रणवीरचे न्यूड फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून हटवण्यात यावेत, अशीही त्यांची मागणी होती. या संदर्भात मुंबई पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले होते. चेंबूर पोलीस रणवीर सिंगला नोटीस बजावण्यासाठी (Police Notice) त्याच्या घरी गेले. त्याला ही नोटीस 16 ऑगस्टपर्यंत सोपवायची आहे, मात्र अभिनेता रणवीर सिंह हा मुंबईबाहेर गेला आहे. तो घरी न सापडल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. रणवीर सिंगला 22 ऑगस्टला चेंबूर पोलिसात हजर राहावे लागेल, असे नोटीसमध्ये लिहिले आहे. रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, आयटी कायद्याच्या कलम 67अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक कलाकारांचं रणवीरला समर्थन

रणवीर सिंगने पीपल मॅगझिनसाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. वाढत्या वादामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने त्याला पाठिंबा दिला. त्यात आलिया भट्ट, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, मसाबा गुप्ता, अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिया मिर्झा, राम गोपाल वर्मा, पूनम पांडे यांचा समावेश आहे. या न्यूड फोटोशूटसाठी दीपिका पदुकोणनेही रणवीर सिंगला सर्वाधिक सपोर्ट केला. या शूटिंगदरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पती रणवीरसोबत राहिली. रणवीरला या फोटोशूटसाठी तिने आत्मविश्वासही दिला. अशाही बातम्या बाहेर आल्या होत्या, मात्र याबाबत दीपिकाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

रणवीर पोलिसांसमोर हजर राहणार?

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘जयेशभाई जोरदार’मध्ये दिसला होता. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तो नंतर Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. याशिवाय रणवीर सिंगचे दोन चित्रपट आहेत. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ आणि करण जोहरचा ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. मात्र या फोटोशूटचा वाद त्याची पाठ सोडाची नाव घेत नाहीये. आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करणार आणि दिलेल्या तारखेला रणवीर सिंह हा पोलिसांसमोर हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...