AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातवरील सिनेमात एकनाथ शिंदे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांचीही व्यक्तीरेखा… कोणी साकारली भूमिका?; दीपाली सय्यद यांनी दिली मोठी बातमी

Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या अशोक खरातवरील चित्रपटात अभिनेत्री दीपाली सैय्यद-भोसले नेत्या रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात इतरही नेत्यांचा रोल असणार आहे.

लिंगपिसाट खरातवरील सिनेमात एकनाथ शिंदे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांचीही व्यक्तीरेखा... कोणी साकारली भूमिका?; दीपाली सय्यद यांनी दिली मोठी बातमी
Maharashtra Epstein Files Deepali SayyadImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 5:22 PM
Share

भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची चर्चा संपूर्ण राज्यात गाजली होती. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सैय्यद-भोसले रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक चर्चित चेहऱ्यांच्या भूमिका कोणी केल्या याबाबत दिपाली सय्यद यांनी माहिती दिली आहे.

अनेक नेत्यांची भूमिका

दीपाली सय्यद यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले की, आता टीचर लॉन्च झाला आहे, सगळ्यांनी बघितला आणि लोक त्याला खूप प्रतिसाद चांगला देत आहेत. दोन ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहेत. हा एक वेगळा आणि रियल सब्जेक्ट आहे. या चित्रपटात बरेच कलाकार आहेत. स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत सगळं येईल. प्रत्येक नेत्यांचा यामध्ये रोल आहे.

अंधारे-दमानिया यांची आक्रमकता सिनेमात दिसणार

पुढे बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, सिनेमात एकनाथ शिंदे, अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांचीही व्यक्तिरेखा आहे. मात्र या नेत्यांची भूमिका कोणी साकारली हे आगामी काळात समोर येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हीच आक्रमकता आता या चित्रपटातून समोर येणार आहे.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर राजकारणात बदल होणार

दीपाली सय्यद यांनी या चित्रपटाच्या शूटिंगवेळी धमकी आली होती. यावर बोलताना सय्यद यांनी सांगितले की, धमक्या आता थांबल्या आहेत, पण धाकधूक आहे. त्यामुळे शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवले आहेत. मी तक्रार केली नाही, मला असं वाटत होतं की अजून फोन आले तर मी जाऊन तक्रार करणार आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारणात बदल होईल, असा दावाही दीपाली सैय्यद यांनी केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन