
मुंबई : बॉलिवूडची आयटम क्वीन मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 50 व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस कायम आहे. तसंच अनेक अभिनेत्रींना लाजवेल असा तिचा फिटनेस आहे. मलायकाचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही मलायकाने चाहत्यांसोबत तिचे एका कॉन्सर्टमधील मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सध्या तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मलायकाने द बॅकस्ट्रीट बॉईजच्या मुंबई कॉन्सर्टला हजेरी लावली होती. यावेळी तिने भरपूर एन्जॉय केला. या कॉन्सर्टली ती तिच्या फ्रेंड सर्कलसोबत गेली होती. तर यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ मलायकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
मलायका अरोरा ही अशी अभिनेत्री जी तिच्या फिटनेसने लोकांना मात देते. विशेष म्हणजे मलायका तिच्या दिवसाची सुरुवात योगा आणि व्यायामाने करते. यासोबतच ती तिच्या मोकळ्या वेळेत मित्रांसोबत एन्जॉय करतानाही दिसते. अलीकडेच तिनं कॉन्सर्ट भेटीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती मनसोक्त मजा करताना दिसत आहे. यावेळी मलायकाने ब्लॅक कलरचा मिनी ड्रेस परिधान केला होता, ज्या ती खूपच डॅशिंग दिसत आहे.
या कॉन्सर्टमध्ये मलायका व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. यामध्ये मीजान जाफरी, युलिया वंतूर, अर्पिता खान शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, डायना पेंटी, मिथिला पालकर आणि वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हे कलाकार उपस्थित होते.
मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मलायका छैय्या छैय्या या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. तसंच तिनं तिच्या करिअरमध्ये अनेक आयटम साँग केले आहेत. अनारकली डिस्को चली, मुन्नी बदनाम हुई यासारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये ती दिसली आहे. तसंच तिने इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल, इंडियाज बेस्ट डान्सर, झलक दिखला जा आणि नच बलिए यांसारख्या शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.