Virat Kohli : रोहित-बुमराहची निवड, विराटला डच्चू, या टीममधून पत्ता कट
Virat Kohli IPL : विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून जगातील लोकप्रिय टी 20 लीग स्पर्धेत खेळत आहे. विराटच्या आरसीबीने 18 व्या मोसमात पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र आता विराटला मोठा झटका लागला आहे. विराटला आरसीबीच्याच खेळाडूने त्याच्या बेस्ट आयपीएल टीममधून वगळलं आहे.

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) इतिहास घडवला. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. या ऐतिहासिक कामगिरीसह आरसीबीच्या निष्ठावंत चाहत्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली. आरसीबीला चॅम्पियन करण्यात रजत पाटीदार, विराट कोहली आणि विकेटकीपर जितेश शर्मा या तिघांनी महत्त्वाचं योगदान दिलं. जितेशने रजतच्या अनुपस्थितीत काही सामन्यात नेतृत्वही केलं. जितेशने कॅप्टन्सी, विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशा तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आणि चाहत्यांची मनं जिंकली. मात्र जितेश शर्माच्या एका निर्णयामुळे आरसीबीच्या चाहत्यांचं डोकं सटकलंय. जितेश शर्मा याने एका मुलाखतीत आयपीएलमधील ऑलटाईम बेस्ट प्लेइंग ईलेव्हन टीम सांगितली. जितेशच्या या बेस्ट प्लेइंग ईलेव्हन मध्ये विराटचं नाव नसल्याचं चाहते संतापले आहेत.
विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 8 शतकांचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. मात्र त्यानंतरही जितेशने त्याच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराटला संधी दिली नाही. तसेच जितेशच्या बेस्ट प्लेइंग ईलेव्हनमध्ये विराटसह यॉर्कर किंग लसिथ मलिंगा, ऑलराउंडर सुनील नारायण, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश नाही.
जितेशची प्लेइंग ईलेव्हन, कुणाला कोणती जबाबदारी?
जितेशने त्याच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये ओपनर म्हणून रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्ट या दोघांना पसंती दिली आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव याची निवड केली आहे. जितेशने ऑलराउंडर म्हणून जॅक कॅलिस आणि हार्दिक पंड्या या दोघांना संधी दिली आहे. तसेच विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंह धोनी याचा समावेश केला आहे.
जितेशच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मिस्टर 360 म्हणून क्रिकेट विश्वात ओळख असलेल्या एबी डी व्हीलियर्स हा देखील आहे. तसेच जितेशने स्वत:सह अक्षर पटेल यालाही संधी दिलीय. जितेशने फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती याच्यावर विश्वास दाखवला आहे. तर जितेशने जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूड या दोघांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे.
जितेश शर्माची आयपीएलमधील ऑलटाईम बेस्ट प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, एडम गिलख्रिस्ट, सूर्यकुमार यादव, जॅक कॅलिस, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, एबी डिव्हीलियर्स, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि जॉश हेजलवूड.
