WPL 2026, MI vs GG : मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखणार?
Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women : मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स वूमन्स या दोन्ही संघांचा हा या चौथ्या मोसमातील तिसरा सामना असणार आहे.

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना असणार आहे. मुंबईने याआधीच्या 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर गुजरात अजिंक्य आहे. गुजरातने एकूण आणि सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुजरातला सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. त्यामुळे मुंबई सलग दुसरा सामना जिंकून गुजरातच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना मंगळवारी 13 जानेवारीला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
पलटण गुजरातला रोखणार का?
गुजरातने या मोसमातील पहिल्या दोन्ही सामन्यात विजयी धावांचा यशस्वी बचाव करत सामने जिंकले आहेत. तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुजरातने दोन्ही सामन्यांत 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गुजरातला मोजक्याच काही धावांनी विजय मिळवता आला आहे. यावरुन गुजरातची बॉलिंग लाईन फारशी प्रभावी नाही, हे स्पष्ट होतं.
गुजरातने असे जिंकले पहिले 2 सामने
गुजरातने पहिल्या सामन्यात 10 तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातने युपी विरुद्ध 207 धावा केल्या. तर युपीला प्रत्युत्तरात 197 धावांपर्यंत पोहचता आलं. तर गुजरातने दिल्ली विरुद्ध 209 धावा केल्या. तर दिल्लीने जोरदार झुंज दिली. मात्र दिल्लीला 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशाप्रकारे गुजरातने फक्त 4 धावांनी सामना जिंकला. मात्र असं असलं तरी गुजरातने सलग दोन्ही सामने जिंकलेत ही सत्यस्थिती आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईला आरसीबी विरुद्ध या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर मुंबईने दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. मुंबईने दिल्ली कॅपिट्ल्स टीमवर मात केली आणि विजयाचं खातं उघडलंय. त्यामुळे आता मुंबई हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात गुजरातला पराभवाची धुळ चारत सलग दुसरा सामना जिंकणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.
