MI vs DC : मुंबईचा दणदणीत विजय, दिल्लीचा पहिल्या सामन्यात 50 धावांनी धुव्वा
WPL 2026 Mumbai Indians vs Delhi Capitals Women Match Result : हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चौथ्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं आहेत. गतविजेत्या संघाने दिल्लीचा 50 धावांनी धुव्वा उडवला.

मुंबई इंडियन्स टीमने (Mumbai Indians) वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत चौथ्या मोसमातील (WPL 2026) तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा (Delhi Capitals) धुव्वा उडवला आहे. मुंबईने दिल्लीसमोर 196 धावांचं आवहान ठेवलं होतं. मात्र पलटणच्या गोलंदाजांसमोर दिल्लीला हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईने दिल्लीला 10 ओव्हरमध्ये 145 धावांवर गुंडाळलं. मुंबईने यासह आपल्या दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. मुंबईने दिल्लीचा 50 धावांनी धुव्वा उडवला. कर्णधार हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर ब्रँट, निकोला केरी आणि अमेलिया केर या चौघांनी मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही योगदान दिलं. तर दुसऱ्या बाजूला जेमीमाह रॉड्रिग्स कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीला विजयी करण्यात अपयशी ठरली.
हरमनप्रीत आणि नॅट सायव्हर ब्रँटचा अर्धशतकी तडाखा
दिल्लीने मुंबईला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीतने नाबाद 74 धावांची चाबूक खेळी केली. ब्रँटने 70 रन्स केल्या. निकोला केरी हीने 21 तर जी कामालिनी हीने धावांचं योगदान दिलं. मुंबईने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी नंदीनी शर्मा हीने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
दिल्लीचे फलंदाज मुंबईसमोर ढेर
मुंबईने 196 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीला ठराविक अंतराने झटके दिले. दिल्लीच्या चिनेल हेन्री हीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. दिल्लीसाठी चिनेल हेन्री हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. चिनेल हेन्री हीने 33 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 169.70 च्या स्ट्राईक रेटने 56 रन्स केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 12 पार मजल मारता आली नाही. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
मुंबई इंडियन्स वूमन्सचा दणदणीत विजय
A convincing victory 👏
Harmanpreet Kaur-led Mumbai Indians bounce back with a massive 5⃣0⃣-run victory 🔝
Scorecard ▶️ https://t.co/aVKBHVKp7c #TATAWPL | #KhelEmotionKa | #MIvDC pic.twitter.com/W2S5eYyDNa
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 10, 2026
निकोला केरी आणि अमेलिया केर या दोघींनी दिल्लीचा अर्धा संघ तंबूत पाठवला.या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. नॅट सायव्हर ब्रँट हीने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. नॅटने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संस्कृती गुप्ता आणि शबनीम इस्माईल या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मुंबईने अशाप्रकारे चौथ्या मोसमातील पहिला विजय साकारला.
