Money Laundering Case | जॅकलिन-नोरानंतर आता कोणाची पाळी? मनी लाँड्रिंगप्रकरणात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी ईडीच्या निशाण्यावर!

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग  (Money Laundering) प्रकरणाचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्याशी जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन बॉलिवूड अभिनेत्रींचे संबंध आधीपासूनच आहेत. या दोघी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) निशाण्यावर आहेत.

Money Laundering Case | जॅकलिन-नोरानंतर आता कोणाची पाळी? मनी लाँड्रिंगप्रकरणात अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी ईडीच्या निशाण्यावर!
Nora Fatehi-Jacquline
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 2:21 PM

मुंबई : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग  (Money Laundering) प्रकरणाचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्याशी जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन बॉलिवूड अभिनेत्रींचे संबंध आधीपासूनच आहेत. या दोघी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) निशाण्यावर आहेत. दरम्यान, आता बातमी समोर आली आहे की, जॅकलिन आणि नोरा नंतर आता ईडी या प्रकरणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर कडक कारवाई करू शकते.

ETimes च्या वृत्तानुसार, ED या प्रकरणात आणखी बॉलिवूड सेलिब्रिटींना समन्स पाठवू शकते. अहवालात असे म्हटले आहे की, जॅकलिन आणि नोरा व्यतिरिक्त, ईडीला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड सापडले आहेत. सध्या हे सेलिब्रिटी कोण आहेत ही माहिती समोर आलेली नाही आणि ईडीने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

नोरा आणि जॅकलिनला सुकेशने दिले महागडे गिफ्ट!

या प्रकरणी ईडीने आरोपी सुकेश चंद्रशेखरविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जॅकलिन आणि नोराच्या नावाचाही समावेश आहे. या आरोपपत्राद्वारे, ईडीने दावा केला आहे की, जॅकलिनला सुकेशकडून कोट्यवधींच्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, ज्यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख किमतीची गाडी होती. याशिवाय जॅकलिनला सुकेशकडून हिऱ्याच्या वस्तू आणि महागडे कपडे आणि बॅग भेट म्हणून मिळाली.

ईडी या प्रकरणाचा तपास करत असताना सोशल मीडियावर दोन फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये जॅकलीन आणि सुकेश एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते. ज्यानंतर जॅकलिनच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की, अभिनेत्रीचा मनी लाँड्रिंग आरोप असलेल्या सुकेशशी कोणताही संबंध नाही. दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनी बरीच चर्चा केली होती.

नोरालाही महागडे गिफ्ट्स!

सुकेशने तिच्या मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून जॅकलिनशी संपर्क साधला होता. त्याच वेळी सुकेश त्याची पत्नी आणि अभिनेत्री लीना मारिया पॉलच्या माध्यमातून नोरा फतेहीच्या संपर्कात आला. जॅकलिनप्रमाणेच नोराला सुकेशकडून खूप महागडे गिफ्ट्स देण्यात आले होते. या प्रकरणी नोरालाही ईडीने समन्स बजावले असून, सुकेशसोबतच्या तिच्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तथापि, नंतर नोराच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये म्हटले होते की नोराचे म्हणणे केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून घेण्यात आले आहे आणि ती तपासात पूर्ण सहकार्य करत आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या