Nana Patekar : अन् बाळासाहेबांनी दिलेला मढचा फ्लॅट नानांनी नाकारला; कारण ऐकून थक्क व्हाल
नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील अनोख्या मैत्रीचा हा किस्सा आहे. बाळासाहेबांनी नानांना मुंबईत फ्लॅट देऊ केला होता, पण नानांनी तो 'माझ्या प्रेमाच्या व्याख्येत ते बसत नाही' असे सांगून नाकारला. नानांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी, त्यांचे असे अनेक किस्से आजही प्रेरणा देतात.

अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने केवळ सिनेसृष्टीतच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर हे अजातशत्रू होते. त्यांचे सर्वच पक्षात मित्र होते. अगदी ऐकेरी नावाने हाक मारण्याएवढी घट्ट मैत्री त्यांची होती. पण या मैत्रीचा नानांनी कधीच गैरफायदा घेतला नाही. कधीच लाभ घेतला नाही. जिथे लाभ येतो, तिथे प्रेमात दरी निर्माण होते, असं नाना म्हणायचे. शरद पवारांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत त्यांचा सर्वांशी स्नेह होता. बाळासाहेब ठाकरेंना तर ते वडिलांप्रमाणे मानायचे. नेहमी मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटायचे आणि गप्पाही मारायचे.
नाना पाटेकर अनेक मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल भरभरून आणि उत्कटपणे बोलायचे. बाळासाहेबांचं आपल्यावर प्रेम असल्याचं सांगायचे. बाळासाहेबांनी आपल्याला नेहमी आदर दिला, असंही ते म्हणायचे. बाळासाहेबांना जसे उद्धव आणि राज जवळचे आहेत, तसाच मीही आहे, असं नाना पाटेकर नेहमी सांगायचे. बाळासाहेबांविषयीचे अनेक किस्सेही ते सांगत असायचे.
माझ्या प्रेमाच्या व्याख्येत
एकदा त्यांनी बाळासाहेबांविषयीचा एक किस्सा सांगितला होता. तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. त्यातील नानांचं उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. बाळासाहेबांनी मला मुंबईत मढमध्ये एक मोठा फ्लॅट देऊ केला होता. म्हणाले, तू घे हा फ्लॅट. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. माझ्याकडे घर आहे आणि माझ्या प्रेमाच्या व्याख्येत ते बसत नाही. असं मी त्यांना सांगितलं होतं, असं नाना म्हणाले होते. नानाच्या या उत्तरावर बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य उमटलं होतं.
बाळासाहेबांचा फोटो घरात
बाळासाहेबांसोबत मी असंख्य फोटो काढले. त्यांचा एक फोटो मी माझ्या घरात लावला आहे. तो फोटो पाहिल्यावर तुम्हीही चकीत व्हाल. बाळासाहेबांना मी भेटायला मातोश्रीत जायचो तेव्हा फोटोग्राफरने तो काढलेला. बाळासाहेबांनी मला तो अल्बम पाठवून दिला होता. त्यातील फोटो पाहिल्यावर तुम्हीही हरखून जाल. इतके भारी फोटो आहेत, असं सांगताना नाना भावूक व्हायचे. बाळासाहेबांच्या शेवटचे काळात मी त्यांच्यासोबत होतो. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते, असंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलंय.
तो वाद झाला अन्
दादरला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. पुलं देशपांडे यांनी राजकारण्यांवर या संमेलनातून टीका केली होती. त्यावर बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत साहित्यिकांचा समाचार घेतला होता. तेव्हा नाना पाटेकर यांनी साहित्यिकांची बाजू घेऊन बाळासाहेबांच्या भूमिकेविरोधात भाष्य केलं होतं. त्यामुळे दोघांमधील संबंध ताणले गेले होते. पण दोन चार दिवसांनी नानांनी मातोश्रीत जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली. गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांमधील दुरावा कायमचा मिटला होता.