रेपिस्टचा रोल ऑफर होताच नाना भडकले, प्रसिद्ध डायरेक्टरला फुटला होता घाम; काय आहे किस्सा?
अभिनेता नाना पाटेकर यांना ‘आज की आवाज’ सिनेमात दिग्दर्शक रवी चोपडा यांनी रेपिस्टची भूमिका ऑफर केली होती. आपल्या तत्वांविरुद्ध असलेला हा रोल त्यांनी तीव्र शब्दात नाकारला, ज्यामुळे रवी चोपडांना घाम फुटला होता. स्मिता पाटील यांच्या मध्यस्थीनंतर नानांनी खलनायकाची भूमिका स्वीकारली, पण तिची व्यक्तिरेखा स्वतः लिहिली.

अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला जात आहे. अनेकजण नानांच्या सहवासातील अविस्मरणीय क्षण शेअर करत आहेत. काहीजण किस्से ऐकवत आहेत, तर काही जण त्यांच्या अभिनयावर भरभरून बोलत आहेत. यातून नाना पाटेकर हे किती प्रेमळ होते आणि कसे सर्वांच्या अत्यंत जवळचे होते हे स्पष्ट होत आहे. नाना पाटेकर जसे प्रेमळ होते, तसे त्यांचे स्वत:चे म्हणून काही नीतीमूल्य होते. त्या परिघातच ते राहिले. ही चौकट त्यांनी कधी तोडली नाही. अगदी सिनेमा निवडतानाही त्यांनी कधी आपल्या नीतीमूल्यांशी तडजोड केली नाही.
मुंबई बॉम्बस्फोटात संजय दत्तला शिक्षा झाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी संजय दत्त सोबत काम न करण्याचा निर्धार केला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी संजय दत्त सोबत काम केलं नाही. केवळ नावलौकीक, पैसा आणि प्रतिष्ठा मिळाल्यावरच नानांनी नैतिकतेची चौकट स्वीकारली नव्हती, तर अगदी संघर्षाच्या काळातही ते आपलं नीतीमूल्य जपत होते. नाना पाटेकरांना सिनेमात आणण्याचं काम अभिनेत्री स्मिता पाटील यांनी केलं. तोपर्यंत नाना पाटेकर हे रंगभूमीवरच रमले होते. तिथेच ते खूशही होते.
अन् सर्वांसमोर शिव्यांची लाखोली
स्मिता पाटील यांनी आग्रह करून नाना पाटेकर यांना प्रसिद्ध निर्माते बीआर चोपडा यांचे चिरंजीव दिग्दर्शक रवी चोपडा यांच्याकडे पाठवलं. त्यावेळी रवी चोपडा ‘आज की आवाज’ हा सिनेमा बनवत होते. यावेळी रवी चोपडा यांनी नाना पाटेकर यांना रेपिस्टचा रोल ऑफर केला. हे ऐकल्यावर नानांचा पाराच चढला. त्यांनी सर्वांसमोर रवी चोपडा यांना शिव्या घातल्या. मला तू आलतूफालतू व्यक्ती समजतोस का? मी असे रोल करणार? असा संतप्त सवाल नाना पाटेकर यांनी रवी चोपडा यांना केला. नानांचा हा रुद्रावतार पाहून रवी चोपडा यांना घामच फुटला होता.
स्मिता पाटील यांची मध्यस्थी
रवी चोपडांना घालूनपाडून बोलल्यानंतर भडकतच नाना पाटेकर तिथून निघून गेले. नाना गेल्यावर तिथे स्मिता पाटील आल्या. त्यानंतर त्यांनी रवी चोपडा आणि नाना पाटेकर या दोघांनाही समजावलं. त्यानंतर रवी चोपडा यांनी त्यांना या सिनेमात खलनायकाची भूमिका दिली. पण तरीही नाना ऐकायला तयार नव्हते. नाना म्हणाले, मी ही भूमिका करेल. पण माझी व्यक्तिरेखा मीच लिहिल. त्याला मान्यता देण्याशिवाय रवी चोपडा यांच्याकडे पर्यायच नव्हता. अखेर त्यांनी या सिनेमात काम केलं आणि हा सिनेमा गाजलाही होता. या सिनेमाला सर्वश्रेष्ठ सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. तर सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून राज बब्बर आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना पुरस्कार मिळाला होता.
