AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरीशी होणार होती भेट… नानांचा काय होता दुसऱ्या दिवशीचा बिग प्लान? मल्हार थेट म्हणाला…

अभिनेते नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. गोव्यातील शुटींगदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा दुसऱ्या दिवशी माधुरी दीक्षितसोबत KBC चा प्लॅन होता. नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार यांनी नानांच्या आठवणींना उजाळा देताना ही माहिती दिली आहे.

माधुरीशी होणार होती भेट... नानांचा काय होता दुसऱ्या दिवशीचा बिग प्लान? मल्हार थेट म्हणाला...
nana patekar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 4:34 PM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नानांचे कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांनाही नाना गेले यावर विश्वास बसेनासा झाला आहे. नाना गोव्यात शुटिंगसाठी गेले होते. दुसऱ्या दिवशीचाही त्यांचा प्लान ठरला होता. त्यांनी हातात अनेक प्रकल्प घेतले होते. हे प्रकल्प मार्गी लावायचे होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. पण त्या सर्व आता अर्धवट राहिल्या आहेत. नाना पाटेकर गेले, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं काय शेड्यूल ठरलं होतं? ते काय करणार होते? याची माहिती नानांचे चिरंजीव मल्हार पाटेकर यांनी दिली आहे.

मल्हार पाटेकर यांनी हिंदुस्थान टाइम्सला मुलाखत दिलीय. त्यात त्यांनी नानांचा दुसऱ्या दिवशी काय प्लान होता? याची माहिती दिली आहे. नाना पाटेकर गोव्यात होते. माझा चुलत भाऊ प्रसाद हा नानांच्या सिनेमाशी संबंधित सर्व गोष्टी आणि त्यांच्या मिटिंग्स वगैरे पाहायचा. त्याला नानांनी मुंबईला पाठवलं होतं. कारण दुसऱ्या दिवशी माधुरी दीक्षित सोबत नानांना मराठी केबीसीची शुटिंग करायची होती. माझा दुसरा भाऊ अमेयही त्यांच्यासोबत होता. नाना घरात आराम करायला गेल्यावर अमयही तिथून निघून आला होता, अशी माहिती मल्हार पाटेकर यांनी दिली.

म्हणून उशीरा मेसेज केला

नानांना कधीच कुणाला त्रास द्यायला आवडायचं नाही. तो त्यांच्या स्वभावाचा भाग होता. त्यामुळे त्यांना जेव्हा अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा त्यांनी फक्त मेसेज केला. काही वेळानंतर त्यांनी फोन केला. अमय लगेच त्यांच्याकडे पोहोचला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. पहाटे 5 वाजता माझ्या आईचा फोन आला. त्यावेळी मी पुण्यात होतो. त्यानंतर काय झालं हे मला आठवत नाही. वडील गेल्याची बातमी ऐकल्यावर मी सुन्न झालो. माझ्या आसपासचं जग थिजून गेलंय असं मला वाटू लागलं, असं मल्हार म्हणाले.

सिनेमात काम करण्याचा उबग आला

यावेळी मल्हार यांनी नानांना सिनेमे करण्याचा उबग आला होता, असं सांगितलं. त्यांना सिनेमात काम करायचं नव्हतं. कारण आपण वारंवार तेच तेच करतोय, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते स्वत:च कथा लिहिणार होते. एक अभिनेता म्हणून स्वत:ला रोज विकसित केलं पाहिजे, यावर त्यांचा विश्वास होता. त्याच दिशेने ते मार्गक्रमण करत होते, असं मल्हार यांनी सांगितलं.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?