Nawazuddin Siddiqui | खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर हे प्रकरण थेट कोर्टामध्ये पोहचले. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या भावानेही काही आरोप केले आहेत.

Nawazuddin Siddiqui | खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ सुरू असतानाच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीज, चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ
| Updated on: Apr 14, 2023 | 9:02 PM

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची एक्स पत्नी आलिया सिद्दीकी हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) हिने केलेले आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर सतत व्हिडीओ (Video) शेअर करत आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत होती. इतकेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने भाऊ आणि एक्स पत्नी यांच्या विरोधात थेट मानहाणीचा दावा दाखल केला.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे नव्हे तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया ही तिच्या मुलांसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या बंगल्याबाहेर दिसत होती. आपल्याला मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा आरोप तिने केला होता.

खासगी आयुष्यामध्ये हे सर्व सुरू असताना नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी जोगिरा सारा रा रा चे टीझर रिलीज केले. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत नेहा शर्मा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जोगिरा सारा रा रा या चित्रपटाच्या माध्यमातून नेहा शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे प्रेक्षकांचे फुल मनोरंजन करताना दिसणार आहेत. हा एक काॅमेडी चित्रपट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याचा हा चित्रपट 12 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या जोगिरा सारा रा रा या चित्रपटाचे टीजरही प्रेक्षकांना जबरदस्त आवडले असून चाहते आता या चित्रपटाचे वाट पाहताना दिसत आहेत. टीजर व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या टीजर व्हिडीओवर कमेंट करत चाहते नवाजुद्दीन सिद्दीकी याचे काैतुक करताना दिसत आहेत.