Shabaash Mithu | मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत नवं पोस्टर रिलीज, तापसीचा ‘शाबास मिठू’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. यावेळी तापसी तिच्या आगामी चित्रपटात पुन्हा नव्या रुपात दिसणार आहे. त्याच्या ‘शाबाश मिठू’(Shabaash Mithu) या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, त्याची रिलीज डेटही जाहीर झाली आहे.

Shabaash Mithu | मिताली राजच्या वाढदिवसाचं निमित्त साधत नवं पोस्टर रिलीज, तापसीचा ‘शाबास मिठू’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
Shabaas Mithu

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. यावेळी तापसी तिच्या आगामी चित्रपटात पुन्हा नव्या रुपात दिसणार आहे. त्याच्या ‘शाबाश मिठू’(Shabaash Mithu) या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, त्याची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. यावेळी चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘वायकॉम 18 स्टुडिओ’ने ट्विट करून चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करत, याची माहिती दिली आहे. वायकॉम 18 स्टुडिओने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘एका मुलीने तिच्या बॅटने सगळे विश्वविक्रम आणि सर्व स्टिरिओटाईप विचार तोडले. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिठू.’ आज (3 डिसेंबर) मिताली राजचा वाढदिवस देखील आहे. ‘शाबाश मिठू’ची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओने केली आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे.

‘शाबाश मिठू’ हा ‘मिताली राज’चा बायोपिक!

तापसी पन्नू स्टारर ‘शाबास मिठू’ हा भारतीय महिला कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिचा बायोपिक आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तापसी पन्नू भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. डोक्यावर गोल टोपी आणि हातात बॅट असल्याने शूटिंग करताना तिचा लूक खूप छान दिसतो. Viacom18 Studios च्या ट्विटला उत्तर देताना मिताली राज म्हणाली, ‘माझ्या वाढदिवसानिमित्त या ब्लॉकबस्टर गिफ्टबद्दल खूप खूप धन्यवाद.’

तापसी पन्नू व्यतिरिक्त ‘हे’ स्टार्सही झळकणार!

‘शाबास मिठू’ या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तर अभिनेता विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया एव्हॉन देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

खरे तर ‘शाबास मिठू’चे शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होणार होते. पण कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आणि लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबवावं लागलं. चित्रपटाचे शूटिंग परदेशातही झाले आहे. क्रिकेट जगताचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.

तापासीकडे कामाची रांग!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी तापसी पन्नू अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती शेवट स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘रश्मी रॉकेट’मध्ये दिसली होती. आकर्ष खुराना दिग्दर्शित या चित्रपटात गुजरातमधील कच्छमध्ये राहणाऱ्या एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तापसी पन्नूने मुख्य भूमिका साकारली आहे. तापसीशिवाय या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू आणि सुप्रिया पाठक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रश्मी रॉकेट हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित झाला होता.

तापसी पन्नूने 2010 मध्ये राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘झुमंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तापसीचे दुसरे तमिळ पदार्पण होते ‘अदुकलम’. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

हेही वाचा :

Money Heist Season 5 Part 2 | Alicia गेम चेंजर ठरणार की प्रोफेसर पुन्हा एकदा मात देणार? ‘मनी हाईस्ट’च्या शेवटच्या भागात काय घडणार?

Happy Birthday Konkona Sen Sharma | लग्नाआधीच आई होण्याची चाहूल, तब्बल 10 वर्षांनंतर कोंकणा सेन शर्माने मोडला संसार!


Published On - 1:46 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI