मुंबई : गुन्हेगारी आणि ड्रामावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरीज आल्या असल्या, तरी ‘मनी हाईस्ट’चे (Money Heist ) प्रकरण काही वेगळेच ठरले आहे. या स्पॅनिश वेब सीरीजने जगभरात खळबळ उडवून दिली. काही काळापूर्वी या मालिकेचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आधी लोकांना वाटलं की, हा सीरीजचा शेवटचा भाग आहे, पण सीरीज पाहिल्यावर कळलं की, अजून खरा पिक्चर तर यायचा बाकी आहे.