…आणि प्रियांका चोप्रा ॲमेझॉनवर ठरली Best Seller, भारतासह UK आणि US ‘या’ पुस्तकाची धमाल

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) Unfinished हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

...आणि प्रियांका चोप्रा ॲमेझॉनवर ठरली Best Seller, भारतासह UK आणि US 'या' पुस्तकाची धमाल
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 9:23 AM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) Unfinished हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. हे पुस्तक लोकांना आवडत आहे ज्यात प्रियांकाने बर्‍याच कधीही न ऐकलेल्या तिच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या आहेत. प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत सर्वच गोष्टी प्रियांका यामध्ये सांगितल्या आहेत. यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर काही अनेकांना आर्श्चय देखील वाटले. (Priyanka Chopra’s Unfinished book became the most bought book on Amazon)

अमेरिका, भारत आणि ब्रिटनमध्ये या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अ‍ॅमेझॉनमधील सर्वाधिक खरेदी केलेले हे पुस्तक बनले आहे. इतकेच नाही तर लोकांना इतके आवडते आहे की, अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनवरही त्याचे ऑडिओ बुक पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. या व्यतिरिक्त, हे पुस्तक सर्वाधिक खरेदी केलेल्या ऑनलाइन बुक स्टोअर बार्न्स अँड नोबलमध्ये पहिल्या 100 स्थानांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी झाले आहे.

प्रियांकाने या पुस्तकात स्वत: च्या लढाईबद्दल सांगितले आहे की, तिच्या प्रत्येक निर्णयावर ती कशी ठाम राहिली. विशेष म्हणजे प्रियांकाने यामध्ये वंशविवादाबद्दलही चर्चा केली ज्याचा तिला तिच्या आयुष्यात सामना करावा लागला आणि वडिलांच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्याबद्दल तिने लिहिले आहे. याशिवाय प्रियांकाने निकसोबत तिची लव्ह स्टोरी याबद्दल देखील लिहिले आहे.

प्रियांका 10 वीला असताना मावशीच्या घरी शिक्षणासाठी राहत होती अमेरिकेला आणि त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड देखील होता.  तिच्या घरी आता होता आणि मावशी देखील तिच्या रूममध्ये येते त्यावेळी प्रियांका बॉयफ्रेंडला कपाडामध्ये लपवते पण मावशीला अगोदरच शक आलेले असतो त्यामुळे ती कपाडामध्ये बघते आणि बॉयफ्रेंड दिसतो मावशी हे सर्व तिच्या आईला सांगते आणि थोड्याच दिवसात तिला परत भारतामध्ये यायवे लागते हा किस्सा देखील प्रियांकाने तिच्या पुस्तकात सांगितला आहे.

संबंधित बातम्या : 

जॅकलीनचा हवाई अंदाज, फिटनेसची चाहत्यांना भुरळ !

कोरोनाने मदतीचं महत्त्व शिकवलं म्हणत अर्जुन 100 कॅन्सरग्रस्तांना मदत करणार !

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

(Priyanka Chopra’s Unfinished book became the most bought book on Amazon)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.