Vikram Gokhale Passed Away | विक्रम गोखले यांचे निधन, जाणून घ्या अभिनेत्याचा अल्पपरिचय

| Updated on: Nov 26, 2022 | 3:56 PM

विक्रम गोखले यांनी फक्त मराठीच चित्रपट नाही तर अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केला आहेत.

Vikram Gokhale Passed Away | विक्रम गोखले यांचे निधन, जाणून घ्या अभिनेत्याचा अल्पपरिचय
Follow us on

मुंबई : सिनेजगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे सांगितले जात होते. विक्रम गोखले यांच्या पतीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. मात्र, आज विक्रम गोखले यांची प्राणज्योत मावळली आहे. विक्रम गोखले यांनी फक्त मराठीच चित्रपट नाही तर अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केला आहेत.

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत गोखले आणि आईचे नाव हेमवती गोखले होते. विक्रम गोखले यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. विक्रम गोखले यांचे बालपण हे पुण्यातच गेले.

आपल्या करिअरमध्ये विक्रम गोखले यांनी अनेक बाॅलिवूड चित्रपटांसह मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या. अक्षय कुमारच्या मिशन मंगल या चित्रपटात देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका केली.

विक्रम गोखले यांनी त्यांच्या करिअरमध्ये थिएटर, टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 80 हून अधिक चित्रपट आणि 17 मालिकांमध्ये काम केले आहे.

2010 मध्ये विक्रम गोखले यांनी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाचे लेखन डॉ. नितीन लवंगारे यांनी केले असून त्यात अमोल कोल्हे आणि मुक्ता बर्वे महत्वाच्या भूमिकेत होते. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांची खास मैत्री होती.

विक्रम गोखले यांना 2011 मध्ये संगीत नाटक अकादमी, भारताच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमीने दिलेल्या नाट्य नाटकातील अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले.

विक्रम गोखले यांचे वडील एक प्रसिद्ध अभिनेते होते. इतकेच नाही तर त्यांची आजी दुर्गाबाई कामत देखील एक उत्तम कलाकार होत्या. विक्रम गोखले यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.