Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

| Updated on: Jul 20, 2021 | 12:51 PM

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे.

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक
राज कुंद्रा
Follow us on

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक केली. राज कुंद्रा यांच्यावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे.

रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.

रायनवरही आरोप

राज कुंद्रा यांनी रायनवर अश्लील व्हिडीओ लिंकची तांत्रिक बाब सोपवली होती. हे अश्लील चित्रपटांचे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालते, याविषयी रायनला सर्व माहिती होती.

राज कुंद्राला मंगळवारी न्यायालयात हजर करणार

सोमवारी (19 जुलै) रात्री राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना रिमांडवर पाठवले जाईल की, जामीन मिळेल याचा निर्णय घेतला जाईल. राज कुंद्राची लीगल टीम त्याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मेडिकल चाचणी पूर्ण

राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याला मुंबई गुन्हे शाखेत नेण्यात आले. तिथे तब्बल 4 तास ठेवल्यानंतर रात्री तीनच्या सुमारास त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात नेण्यात आले. राज यांचे मेडिकल झाले असून, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना रुग्णालयातून मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात नेले. तेव्हापासून राज तिथेच आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

सोमवारी मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावले होते. जिथे कित्येक तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. राज यांच्या अटकेबाबत अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे राजविरूद्ध पुष्कळ पुरावे आहेत.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

(Raj Kundra case Mumbai crime branch arrest Raj Kundra’s IT Head Ryan Thorope)

हेही वाचा :

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला अटक, दोषी आढळल्यास ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा होणार! जाणून घ्या कायद्याबद्दल…

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात