AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant | लोकांचे मोबाईल हिसकावून घेत राखी सावंत हिने काढला पळ, चाहते हैराण, गाडीमध्ये बसून अभिनेत्रीने केले हे काम

बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिला एक ईमेल करून धमकी देण्यात आलीये. सध्या राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.

Rakhi Sawant | लोकांचे मोबाईल हिसकावून घेत राखी सावंत हिने काढला पळ, चाहते हैराण, गाडीमध्ये बसून अभिनेत्रीने केले हे काम
| Updated on: Apr 22, 2023 | 9:10 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सर्वांनाच मोठा धक्का देत थेट सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करण्याच्या तब्बल सात महिने अगोदरच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न गाठ बांधली. आदिल दुर्रानी यानेच लग्नाची गोष्ट आपल्याला सर्वांपासून एक वर्षांसाठी लपवून ठेवायला सांगितल्याचे राखी म्हणाली. राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आदिल दुर्रानी (Adil Durrani) याचे तनू नावाच्या मुलीसोबत अफेअर असल्याचा खुलासाही राखीने केला.

राखी सावंत म्हणाली की, मी बिग बाॅसच्या घरात जाण्याच्या अगोदर सर्व गोष्टी ठिक होत्या. मात्र, मी बिग बाॅसमधून बाहेर पडल्यावर मला काही गोष्टीमध्ये मोठे बदल जाणवले. आदिल दुर्रानी हा मला धोका देत होता. आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला की, राखी सावंत हिने पोलिसांमध्ये आदिल दुर्रानी विरोधात तक्रार दाखल केली.

आदिल दुर्रानी हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही मी आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार नाहीये. मी त्याला घटस्फोट दिला तर तो अजून मुलींचे आयुष्य खराब करेल. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही सतत चर्चेत आहे. आता सध्या सोशल मीडियावर राखी सावंत हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिचे चाहते तिच्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. मात्र, अचानक सेल्फी घेत असलेल्या चाहत्यांचे मोबाईल हिसकावून घेत राखी सावंत ही पळत पळत आपल्या गाडीमध्ये जाऊन बसते. त्यानंतर राखी थेट गाडीचे दारही लावून घेते. हे पाहून चाहत्यांना काय घडत आहे हेच काही वेळ कळत नाही.

राखी सावंत जोरात हसते आणि गाडीचे दार उघडते आणि चाहत्यांना त्यांचे त्यांचे मोबाईल परत देते. त्यापूर्वी राखी सावंत स्वत: चाहत्यासोबत फोटो घेते. आता राखी सावंत हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये विमानतळावरील इडलीची किंमत ऐकून राखी सावंत हिला धक्का बसल्याचे दाखवण्यात आले होते.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.