AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका

IPL 2026 Points Table : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत एकूण पाचवा सामना जिंकला. राजस्थानच्या या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीला फटका बसला आहे.

IPL 2026 Points Table : लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
Rajasthan Royals Ipl 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 23, 2026 | 4:58 AM
Share

राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सलग 4 सामने जिंकून चाबूक सुरुवात केली. मात्र विजयी चौकारानंतर राजस्थानची गाडी विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. राजस्थानला सलग 2 सामने गमवावे लागले. राजस्थानचा 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामना झाला. लखनौनेही सलग 3 सामने गमावले होते. त्यामुळे लखनौसमोर राजस्थान विरूद्धच्या सामन्यात 22 एप्रिल रोजी सलग चौथा पराभव टाळण्याचं आव्हान होतं. मात्र लखनौ घरच्या मैदानात हे आव्हान पेलण्यात अपयशी ठरली. लखनौला एकाना स्टेडियममध्ये 160 धावांचा पाठलाग करताना 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 119 रन्सच करता आल्या. राजस्थानने अशाप्रकारे 40 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. राजस्थानला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. या सामन्यानंतर राजस्थानने किती मोठी झेप घेतलीय? हे जाणून घेऊयात.

राजस्थानची टॉप 2 मध्ये एन्ट्री

राजस्थानने लखनौला पराभूत करत पॉइंट्स टेबलमधील टॉप 2 मध्ये धडक दिली आहे. राजस्थानला विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला आहे. राजस्थानने चौथ्या क्रमांकावरुन दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. राजस्थानच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादची पिछेहाट झाली आहे. या दोन्ही संघांना 1-1 स्थानने नुकसान झालं आहे. राजस्थान-लखनौ सामन्याआधी हैदराबाद दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानी होती.

राजस्थान दुसरीच टीम

राजस्थानला विजयामुळे नेट रनरेटमध्येही फायदा झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थानचा नेट रनरेट हा आता +0.790 असा आहे जो सामन्याआधी +0.599 असा होता. राजस्थानच्या खात्यात आता 7 सामन्यानंतर 10 गुण झाले आहेत. राजस्थान रॉयल्स 5 सामने जिंकणारी या मोसमातील दुसरी टीम ठरली आहे. राजस्थानआधी पंजाबने 5 सामने जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

लखनौला फटका

तर लखनौ पराभवानंतरही नवव्या स्थानी कायम आहे. मात्र लखनौला या पराभवाचा नेट रनरेटमध्ये फटका बसला आहे. लखनौचा हा 7 सामन्यानंतर पाचवा पराभव ठरला, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट हा -1.277 असा झालाय.लखनौचा नेट रनरेट सामन्याआधी -1.173 असा होता.

पंजाब टेबल टॉपर

दरम्यान पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. पंजाब या मोसमातील एकमेव अजिंक्य टीम आहे. पंजाबने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा केकेआर विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 11 गुण आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल