AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव, राजस्थानकडून 40 धावांनी धुव्वा

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Match Result, IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र लखनौला संपूर्ण 120 बॉलही खेळता आलं नाही.

LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव, राजस्थानकडून 40 धावांनी धुव्वा
Rajasthan Royals Jofra Archer LSG vs RR ipl 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 23, 2026 | 2:40 AM
Share

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसामातील (IPL 2026) 32 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. राजस्थानने यासह 2024 पासूनच्या दुसऱ्या सर्वात निच्चांकी धावसंख्येचा यशस्वी बचाव करत सामना जिंकला आहे. राजस्थानने लखनौसमोर 160 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. लखनौला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. मात्र लखनौला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. राजस्थानने लखनौला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. लखनौचा डाव हा 18 ओव्हरमध्ये 119 रन्सवर आटोपला. राजस्थानने अशाप्रकारे 40 धावांनी हा सामना जिंकला. तर लखनौचा हा घरच्या मैदानातील तिसरा, सलग चौथा तर एकूण पाचवा पराभव ठरला आहे.

राजस्थानची बॅटिंग

लखनौने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 159 रन्स केल्या. लखनौच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील एकालाही 22 धावांपुढे झेप घेता आला नाही. वैभव सूर्यवंशी याने 8 धावा केल्या. तर ध्रुव जुरेल याला भोपळा फोडता आला नाही. कॅप्टन रियान पराग याने 20 धावांचं योगदान दिलं. यशस्वी जैस्वाल आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनी प्रत्येकी 22-22 धावा जोडल्या.डोनोवेन फरेरा याने 20 धावा जोडल्या. तर रवींद्र जडेजा आणि शुबम दुबे ही जोडी नाबाद परतली.

रवींद्र जडेजा याने राजस्थानसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. जडेजाने 29 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 43 रन्स केल्या. तर शुबम दुबे याने निर्णायक 19 धावा जोडल्या. लखनौसाठी मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसिन खान या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

राजस्थानसमोर लखनौचे फलंदाज ढेर

लखनौला 160 धावांचं आव्हान मिळाल्याने ते सहज पूर्ण करतील, असं वाटत होतं. मात्र लखनौला 6 च्या रनरेटने धावा करता आल्या नाहीत. टॉप ऑर्डरमधील मिचेल मार्श याचा अपवाद वगळता इतर तिघांनी निराशी केली. आयुष बडोनी, कॅप्टन ऋषभ पंत आणि एडन मार्करम या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. निकोलस पूरन याने 22 धावा केल्या. तर हिंमत सिंह याने 15 धावांचं योगदान दिलं.

लाईव्ह स्कोअर

मिचेल मार्श याने सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 41 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मार्श मैदानात असल्याने लखनौच्या विजयाचा विश्वास होता. मात्र मार्श आऊट झाल्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी लखनौच्या उर्वरित फलंदाजांना झटपट आऊट केलं. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई या फिरकी जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल