AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार? पाहा संभाव्य प्लेइंग 11

Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2026 : गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार प्रतिष्ठेचा आहे. दोन्ही संघांची या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घ्या.

MI vs CSK : मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार? पाहा संभाव्य प्लेइंग 11
MS Dhoni and Rohit SharmaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 23, 2026 | 5:39 AM
Share

गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे असणार आहे. महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे 19 व्या मोसमात आतापर्यंत एकही सामना खेळता आला नाहीय. तर रोहितला दुखापतीमुळे गेल्या 2 सामन्यांतून बाहेर रहावं लागलं आहे. त्यामुळे या दोघांचं एकत्र कमबॅक होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. त्यामुळे हे दोघे खेळणार की नाहीत? हे गुरुवारी टॉसदरम्यानच स्पष्ट होईल. या निमित्ताने दोन्ही सघांची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते हे जाणून घेऊयात.

मुंबईत 2 बदल अपेक्षित

विजयाने सुरुवात करणाऱ्या मुंबईला सलग 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र मुंबईने आपल्या मोहिमेतील सहाव्या सामन्यात जोरदार कमबॅक करत गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईचा या विजयामुळे विश्वास वाढला आहे.

गुजरात विरुद्ध दानिश मालेवार याला पदार्पणाची संधी देण्यात आली. मात्र त्याला काही खास करता आलं नाही. त्यामुळे रोहितचं कमबॅक झाल्यास दानिशला बाहेर व्हावं लागू शकतं. तसेच रोहित खेळण्यास उपलब्ध नसल्यास रायन रिकेल्टन याला संधी दिली जाऊ शकते. तसेच कृष भगत यानेही गुजरात विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं होतं. कृषला डच्चू देऊन शार्दूल ठाकुर याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच विल जॅक्स मुंबईसह जोडला गेला आहे. त्यामुळे विलची प्लेइंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा/दानिश मालेवार, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स/शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, अल्लाह गजनफर, कृष भगत/शार्दूल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार.

चेन्नईकडून 2 बदलांची शक्यता

तसेच मुंबई विरूद्धच्या सामन्याआधी युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. म्हात्रेच्या जागी अद्याप बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे धोनी थेट आयुषची जागा घेणार का? अशी चर्चा पाहायला मिळत आहेत. तसेच मॅथ्यू शॉर्ट याच्या जागी मॅट हेन्री याचा समावेश केला जाऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेव्हीस, सर्फराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट/मॅट हेन्री, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी आणि गुरजापनीत सिंह.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल