AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Setu: ‘राम सेतू’ने अखेर अक्षयला बुडण्यापासून वाचवलं; मिळाला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद!

तीन फ्लॉप चित्रपटांनंतर 'राम सेतू'ने अक्षयला तारलं; जाणून घ्या कमाई..

Ram Setu: 'राम सेतू'ने अखेर अक्षयला बुडण्यापासून वाचवलं; मिळाला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद!
Ram SetuImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 28, 2022 | 2:10 PM
Share

मुंबई- या वर्षभरात आतापर्यंत तीन फ्लॉप चित्रपटांनंतर अखेर ‘राम सेतू’ने अभिनेता अक्षय कुमारला तारलं आहे. राम सेतू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. त्यामुळे अक्षयला दिलासा मिळाला आहे. 25 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे याच दिवशी अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’सुद्धा प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी चित्रपटावरून झालेला वाद आणि अजय देवगणच्या चित्रपटाशी टक्कर यांमुळे ‘राम सेतू’च्या कमाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाची चांगली कमाई होत आहे.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाने 8.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत राम सेतूच्या कमाईचा आकडा हा 35.40 कोटींच्या घरात पोहोचला आहे. पहिला वीकेंड या चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शनिवारी आणि रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

राम सेतूच्या कमाईचा हा आकडा अक्षय कुमारसाठी दिलासादायक आहे. ‘बेल बॉटम’ (19 ऑगस्ट 2021), बच्चन पांडे (18 मार्च 2022), सम्राट पृथ्वीराज (3 जून 2022) आणि रक्षाबंधन (11 ऑगस्ट 2022) हे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करू शकले नव्हते.

गेल्या वर्षभराचा कालावधी पाहता ‘सूर्यवंशी’ हा अक्षयचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर आता ‘राम सेतू’ची कमाई चांगली होताना दिसतेय.

अभिषेक शर्मा दिग्दर्शित राम सेतू या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अक्षयने आर्यन कुलश्रेष्ठ नावाच्या एका पुरातत्त्व विशेषज्ञाची भूमिका साकारली आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...