AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गंगुबाईचा ट्रेलर कसा वाटला?, रणबीरकडून आलियाची स्टाईल कॉपी, म्हणतो, ‘बोले तो झक्कास!’

Gangubai Kathiawadi : रणबीरने सिनेमातील आलियाच्या एका स्टेप्सची कॉपी केली आहे. जेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी सिनेमाचा ट्रेलर कसा वाटला? असं विचारलं त्यावेळी त्याने आलियाची हात जोडल्याची स्टेप्स करत सिनेमाचा ट्रेलर अप्रतिम असल्याचं सांगितलं.

गंगुबाईचा ट्रेलर कसा वाटला?, रणबीरकडून आलियाची स्टाईल कॉपी, म्हणतो, 'बोले तो  झक्कास!'
आलिया भट्ट, रणबीर कपूर
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 10:40 AM
Share

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी‘चा (Gangubai Kathiawadi) ट्रेलर कालच (शुक्रवारी) रिलीज झाला आहे. या ट्रेलरला तिच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. चाहत्यांबरोबरच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूरलाही (Ranbir kapoor) आलियाचा अभियन खूपच भावला आहे. तसंच रणबीरची आई नीतू कपूर (Neeta Kapoor) यांनीही ट्रेलरवर समाधान व्यक्त करत आलियाच्या कामाला दाद दिली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर आज शुक्रवारी रिलीज होताच, नीतू कपूर यांनी आलियाचं तोंडभरुन कौतुक केलं त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला ट्रेलर शेअर करत ‘उफ्फ शानदार’ म्हणत इमोजी शेअर करुन आनंद व्यक्त केला. दुसरीकडे रणबीरने सिनेमातील आलियाच्या एका स्टेप्सची कॉपी केली आहे. जेव्हा त्याला फोटोग्राफर्सनी सिनेमाचा ट्रेलर कसा वाटला? असं विचारलं त्यावेळी त्याने आलियाची हात जोडल्याची स्टेप्स करत सिनेमाचा ट्रेलर अप्रतिम असल्याचं सांगितलं.

रणबीर कपूरकडून आलियाची नक्कल

‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूर एका ठिकाणी स्पॉट झाला. तिथल्या मीडियाकर्मींनी आलियाच्या सिनेमावर त्याची प्रतिक्रिया विचारली. यावर रणबीरने गंगूबाईंच्या शैलीत हात जोडून नमस्कार केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो स्टार फोटोग्राफर Viral Bhayani ने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.

आलियाचा दमदार अभिनय

आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर ‘गंगूबाई झिंदाबाद’ असं कॅप्शन देऊन ट्रेलर शेअर केला आहे. आलियाच्या अनेक चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील मित्रांनी आलियाच्या कामाचं कौतुक केले. ‘गंगुबाई काठियावाडी’च्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टने गंगुबाईची अप्रतिम व्यक्तिरेखा साकारलेली दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण करीम लाला यांच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. अजय देवगणने यापूर्वी 1999 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले होते.

‘गंगुबाई काठियावाडी’ 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ आधी 18 फेब्रुवारीला रिलीज होणार होता, पण त्याचं प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आलं. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 72 व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. 25 फेब्रुवारीला आलियाचा सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Abhishek Bachchan Birthday : नकली हिऱ्याची अंगठी घालून प्रपोज, अभिषेक ऐश्वर्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज

राज कुंद्राचं खास गिफ्ट, 38 कोटींचा फ्लॅट शिल्पा शेट्टीच्या नावे केला

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.