‘पत्थर के फूल’च्या चित्रीकरणादरम्यान सतत भांडायचे रवीना-सलमान, एकत्र काम करण्यासही दिला होता नकार!

| Updated on: Oct 28, 2021 | 6:46 PM

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या काळातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. ती आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिवाने तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला.

‘पत्थर के फूल’च्या चित्रीकरणादरम्यान सतत भांडायचे रवीना-सलमान, एकत्र काम करण्यासही दिला होता नकार!
Raveena-Salman
Follow us on

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या काळातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. ती आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिवाने तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला.

बॉलिवूडच्या ‘मस्त-मस्त गर्ल’ने अलीकडेच एका मुलाखतीत किस्सा सांगताना म्हटले की, अभिनेता सलमान खान (Salman Khan)आणि ती ‘पत्थर के फूल’ या डेब्यू चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान खूप भांडायचे. रवीनाने त्यांना ब्रॅट म्हटले आणि सलमान खानने त्यांच्यासोबत पुन्हा काम करणार नसल्याचे देखील सांगितले होते, असा खुलासा तिने केला.

‘पत्थर के फूल’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळावला!

‘पत्थर के फूल’चे दिग्दर्शन अनंत बलवानी यांनी केले होते आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. यामध्ये सलमान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता, जो रवीनाच्या प्रेमात पडतो. रवीना गँगस्टरच्या मुलीची भूमिका साकारत होती. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

सलमान म्हणाला, ‘मी तिच्यासोबत काम करणार नाही!’

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली की, आम्ही एकाच वर्गातील दोन भांडखोर मुलांप्रमाणे भांडायचो. मी साडेसोळा वर्षांची होते आणि सलमान 23 वर्षांचा होता. सलमान आणि माझा स्वभाव सारखाच होता. आम्ही दोघे अशा ठिकाणी लहानाचे मोठे झालो जिथे सलीम काका आणि माझे वडील एकत्र काम करायचे. जणू काही घरातूनच आमची भांडणे सुरूच व्हायची आणि संपूर्ण चित्रपटभर आमची भांडणे चालूच असायची. यादरम्यान सलमान म्हणाला होता की, मी तिच्यासोबत काम करणार नाही. पण, पुन्हा आम्ही ‘अंदाज अपना अपना’मध्ये एकत्र काम केले.

‘अंदाज अपना अपना’ चित्रपट राजकुमार संतोष यांनी 1994 मध्ये दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आमिर खान, परेशल रावल, करिश्मा कपूर, शक्ती कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तो एक कल्ट फिल्म म्हणून उदयास आला. याशिवाय सलमान आणि रवीनाने ‘कहीं प्यार ना हो जाए’मध्येही काम केले आहे. हा चित्रपट के. मुरलीमोहन राव यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात राणी मुखर्जीही मुख्य भूमिकेत होती.

KGF2 मध्ये दिसणार रवीना टंडन

सध्या रवीना आपल्या कुटुंबासोबत लॉस एंजेलिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, रवीना ‘KGF Chapter 2’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात यश, संजय दत्त, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री ‘आरण्यक’ या थ्रिलर मालिकेतून डिजिटल पदार्पण करणार आहे. यात आशुतोष राणा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

हेही वाचा :

परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य…

‘इर्शाद’ नव्हे ‘काव्य पहाट’, ‘No Bindi No Business’नंतर आता शेफाली वैद्यंचा मोर्चा संदीप खरे-वैभव जोशींच्या कार्यक्रमाकडे!