Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत हातात हात घालून जाणारी मिस्ट्री गर्ल कोण होती? उत्तर मिळालं!

Who was that Mistry Girl with Hrithik Roshan : हृतिकसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण, यावरुन तर्कवितर्क लढवले जात होते. मुंबईतील एका प्रसिद्ध जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये हृतिक रोशन शुक्रवारी डिनरसाठी गेला असता..

Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत हातात हात घालून जाणारी मिस्ट्री गर्ल कोण होती? उत्तर मिळालं!
हृतिकसोबत स्पॉट झालेली मिस्ट्री गर्ल!
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 9:28 PM

मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा शुक्रवारी मुंबईत डिनरसाठी जाताना स्पॉट झाला होता. कोरोनातून बरा झाल्यानंतर हृतिक पहिल्यांदाच बाहेर डिनरसाठी आल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपलं गेलं. दरम्यान, यावेळी हृतिकसोबत एक मुलगीदेखील होती. ही मुलगी नेमकी कोण होती, यावरुन चर्चांना उधाण आलं होतं. हृतिकसोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण, यावरुन तर्कवितर्क लढवले जात होते. मुंबईतील एका प्रसिद्ध जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये (Popular Japanese Restaurant in Mumbai) हृतिक रोशन शुक्रवारी डिनरसाठी गेला असता यावेळी हृतिकनं आपल्यासोबत असलेल्या मुलीचा हात हातात धरला होता. याचा व्हिडीओदेखील समोर आलेला. व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर अखेर आतचा ही मिस्ट्री गर्ल कोण आहे, याबाबतदेखील खुलासा झाला आहे. हातात हात खालून हृतिक रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता. याच वेळी हृतिकची चुलत बहीण पाशमिना रोशनही दिसली होती. पाशमिना ही हृतिक रोशने काका राजेश रोशन याची मुलगी आहे. अनेकांनी हृतिकचा अनोळखी मुलीसोबतचा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण मिस्ट्री गर्लबाबत सुरु झालेल्या चर्चांना अखेर आता पूर्णविराम लागलाय.

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

 

होय, ती साबा आझादच होती!

सुरुवातीला हृतिक रोशनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काहींनी हृतिकसोबत दिसलेली मुलगी ही साबा आझाद असल्याचाही दावा केला होता. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं असून हृतिक सोबत स्पॉट झालेली ती मिस्ट्री गर्ल साबा आझादच होती, हे आता स्पष्ट झालं आहे.

कोण आहे साबा आझाद?

साबा आझाद ही एक तरुण संगीतकार आणि अभिनेत्रीदेखील आहे. नासिरुद्दीन शाह यांच्या मुलासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी सबा आझाद यांनी काम केलं होतं. पण मुलीसोबत हृतिक दिसल्यानं आता तो एका नव्या मुलीला डेट करतोय की काय, असाही सवाल काही चाहत्यांनी विचारला आहे. साबा आझाद हीनं दिल कबड्डी आणि मुझसे दोस्ती करोगीमध्ये काम केलंय.

नुकताच कोरोनातून झाला बरा!

हृतिक रोशनला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यातून तो बरादेखील झाला होता. हृतिकच्या एक्स वाईफ सुजैनला कोरोनाची लागण झाल्यानंतर हृतिकही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अनेक दिवसांनंतर हृतिकचा एक तरुणीसोबतचा डिनरला गेल्याचा व्हिडीओ समोर आला आल्याचं चर्चांना उधाण आलं होतं. एका नव्या मुलीसोबत हृतिक पुन्हा डेटवर गेला होता का? हृतिक आणि साबा एकमेकांच्या प्रेमात पडलेत का? अशा प्रश्नांची कुजबूज आता चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या :

10 लाख घेत निघाला घरी! निशांत भट्टचा बिग बॉसच्या घरातून निघण्याचा निर्णय चुकला? काय म्हणाला भाईजान

मोदी आणि शाहांनीही Why I Killed Gandhi सिनेमा पाहिला? निर्मात्या कल्याणी सिंग म्हणाल्या की…

सलमान हिशोबात नायतर पेनाने कोथळा काढू, बिचुकले पुन्हा भडकले, तर मुख्यमंत्र्यांना काय सल्ला दिला?