मोदी आणि शाहांनीही Why I Killed Gandhi सिनेमा पाहिला? निर्मात्या कल्याणी सिंग म्हणाल्या की…

गोविंद ठाकूर

गोविंद ठाकूर | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Jan 30, 2022 | 8:38 PM

Why I Killed Gandhi Movie : कल्याणी सिंह यांनी म्हटलंय, की नथुराम गोडसेच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते आम्ही चित्रपटात दाखवले आहे, सार्वजनिक डोमिंगवर न्यायालयाची संपूर्ण सुनावणी आहे, त्यातून ही कथा घेण्यात आली आहे.

मोदी आणि शाहांनीही Why I Killed Gandhi सिनेमा पाहिला? निर्मात्या कल्याणी सिंग म्हणाल्या की...
निर्मात्या कल्याण सिंग यांचं महत्त्वाचं विधान

मुंबई : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका केल्यानं वाद चांगलाच पेटला होता. अखेर वाद सुरु असतानाच अखेर 22 जानेवारीलाच हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सिनेमाच्या निर्मात्या कल्याणी सिंग यांनी सांगितलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना Why I Killed Gandhiया सिनेमाच्या निर्मात्या कल्याणी सिंग यांनी अनेक बाबींवर वक्तव्य केलंय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Narendra Modi & Amit Shah) यांनी हा सिनेमा पाहिला असल्याच्या शक्यतेवरही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसेंच्या भूमिकेत दिसल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या वादाला राजकीय रंगही लागले होते. 30 जानेवारीला हा सिनेमा रिलीज करण्याचं ठरलं होतं. मात्र वाद झाल्यानंतर चॅनलने सिनेमाच आधीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला. 22 जानेवारी रोजी Why I Killed Gandhi सिनेमाल रिलीज करण्यात आल्याची माहिती कल्याणी सिंग यांनी दिली आहे. आम्ही चित्रपट बनवला तेव्हा असा विरोध होईल असे वाटले नव्हते, असंही त्यांनी म्हटलंय. शिवाय या चित्रपटात निषेध करण्यासारखं काहीही नाही, असंही त्यांनी नमूद केलंय.

मोदी-शाहांनीही पाहिला सिनेमा?

कल्याणी सिंह यांनी म्हटलंय, की नथुराम गोडसेच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते आम्ही चित्रपटात दाखवले आहे, सार्वजनिक डोमिंगवर न्यायालयाची संपूर्ण सुनावणी आहे, त्यातून ही कथा घेण्यात आली आहे. Why I Killed Gandhi गांधी सिनेमाच्या निर्मात्या असलेल्या कल्याणी यांनी पुढे असंही म्हटलंय की, सरकारमधील मंत्र्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. कदाचित पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही हा चित्रपट पाहिला असेल, अशीही शक्यता कल्याणी सिंह यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना व्यक्त केली आहे. इतकंच काय तर सद्यस्थितीत मला महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याचा फोन आलेला नाही किंवा विरोध करणाऱ्या कोणाचाही मला फोन आलेला नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विरोध करण्याआधी सिनेमा पाहा…

अमोल कोल्हे यांना या चित्रपटात जेव्हा कास्ट केलं होतं, तेव्हा ते खासदार नव्हते, असंही कल्याणी यांनी म्हटलंय. मी जेव्हा या चित्रपटाचा सिक्वेल बनवेल, तेव्हादेखील अमोल कोल्हेलाच साइन करेन, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. मी गांधींना का मारले, या फिल्मचा विरोध करणार्‍यांना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही हा चित्रपट एकदा पहा. गांधीजींची हत्या का झाली हे लोकांना कळावे म्हणून हा चित्रपट बनवण्यात आला आहे, असं आवाहन कल्याणी सिंह यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

Nana Patole | Why I killed Gandhi? या Amol Kolheच्या चित्रपटाला आमचा विरोध : नाना पटोले – tv9

‘मागे व्हा, तुम्ही ब्राम्हण नाही!’ असं म्हटल्यानंतर गांधींनी टिळकांच्या अंत्ययात्रेत नेमकं काय केलं?

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI