AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या सवालावर बोलतीच बंद… अभिनेत्री ऋचा चड्ढावर महिला काहीच्या काही भडकली

अभिनेत्री ऋचा चड्ढा महिला हक्कांसाठी बोलत असताना एका महिलेने तिला पुरुषांच्या सुरक्षेबद्दल विचारून निरुत्तर केले. मुस्कान रस्तोगी प्रकरणाचा उल्लेख करत, मुलांवर होणाऱ्या अन्यायावर लक्ष वेधले. एनसीआरबीच्या आकडेवारीसह तिने पुरुषांच्या आत्महत्या आणि दुःखावर प्रकाश टाकला, ज्यामुळे ऋचाची बोलती बंद झाली. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

त्या सवालावर बोलतीच बंद... अभिनेत्री ऋचा चड्ढावर महिला काहीच्या काही भडकली
Richa ChadhaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2026 | 6:25 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा चड्ढा नेहमी सामाजिक राजकीय मुद्द्यावर दमदारपणे व्यक्त होत असते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये ऋचाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारी अभिनेत्री म्हणून ऋचाकडे पाहिले जाते. आता ऋचाचा एका इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिला मुलांच्या सुरक्षेविषयी सवाल करताना दिसत आहे. या महिलेने मुस्कान रस्तोगी आणि सोनम रघुवंशी प्रकरणाचा उल्लेख करत ऋचाला उलटेसुलटे प्रश्न विचारून भांडावून सोडलं आहे. ही महिला एवढी भडकली की ऋचाची बोलतीच बंद झालेली पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. ऋचा तिच्या सेशनमध्ये ऑडियन्समध्ये बसलेल्या लोकांना प्रश्नाची उत्तरे देताना दिसत आहे. त्यावेळी एका महिलेने ऋचाला आडवेतिडवे प्रश्न विचारून भांडावून सोडलं. या ठिकाणी मुलींना वाचवण्याची चर्चा होत आहे. पण मुलांना कोण वाचवणार आहे? असा सवाल या महिलेने ऋचाला केला. मुलींना खूप शिकवलं. वाढवलं. पण मुलांचं काय करायचं? त्यांना खड्ड्यात फेकून द्यायचं का? प्रत्येकवेळी मुलांचीच चुकी तर राहत नाही ना मॅम? असा सवाल करताना ही महिला दिसत आहे.

या महिलेने हा सवाल करताच ऋचाने मला तुमचा प्रश्न समजला नाही, असं म्हटलं. त्यानंतर तुमच्या मुलाला कुणापासून वाचवायचं आहे? असा सवाल ऋचा या महिलेला करते. त्यावर ही महिला आणखीनच भडकली. ती म्हणाली, मला माझ्या मुलाला मुस्कान रस्तोगीपासून वाचवायचं आहे. मला माझ्या मुलाला सोनमपासून वाचवायचं आहे. मुस्कान रस्तोगीने नवऱ्याला मारून टाकलं आणि ड्रममध्ये पुरलं. मला त्या मुस्कानपासूनही मुलाला वाचवायचं आहे. माझ्या मुलाला आज लग्न करायचं नाहीये, असं ही महिला म्हणताना दिसत आहे.

आकडेच ठेवले…

त्यानंतर या महिलेने जे केलं त्याची अभिनेत्री ऋचालाही कल्पना नसेल. या महिलेला ऋचाने आधी काऊंटर करण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने क्राईम केला. तिचं नाव आणि पत्ता सर्व या महिलेला माहीत आहे. याचं कारण काय आहे? कारण माणसं रोज हा गुन्हा करतात. त्यामुळे आम्हाला त्यांचं नाव गाव आठवत नाही, असं ऋचा म्हणाली. ऋचाचं बोलणं ऐकल्यानंतर मग या महिलेने आकडेवारीच सादर करून ऋचाची बोलती बंद केली. एनसीआरबीच्या डेटानुसार भारतात 92 हजार लोक आत्महत्या करत आहेत. ही संख्या अडीचपट अधिक आहे. आज भारत बलात्काऱ्यांचा देश नाहीये. मला वाटतं तुम्ही या गोष्टींवरही फोकस ठेवला पाहिजे. पुरुषांचं दु:खंही समजून घेतलं पाहिजे, असं ही महिला म्हणाली.

आंटी रॉक्ड, ऋचा चड्ढा शॉक्ड

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या महिलेचं कौतुक केलं आहे. वेल डन अंटी, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. तर दुसऱ्या यूजर्सने हात जोडलेला इमोजी शेअर केला आहे. त्यासोबत आंटी रिस्पेक्ट, असं कॅप्शन त्याने दिला आहे. तर आणखी एकाने आंटी रॉक्ड, ऋचा चड्ढा शॉक्ड, अशी कमेंट केली आहे. दरम्यान, गेल्यावर्षी आई बनल्यानंतर ऋचाने बॉलिवूडमधून थोडा ब्रेक घेतला आहे. तिची एक नवीन सीरिज येत आहे. त्यात ती डिटेक्टिव्हची भूमिका करताना दिसत आहे.

Follow Us
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम