सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल! पाहा नेमकं काय झालं…

| Updated on: Aug 12, 2021 | 11:45 AM

सलमान खानने मीराबाई चानूची भेट घेतल्याचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर बॉलिवूडचा हा भाईजान सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये लोकांनी असे काहीतरी पाहिले, ज्यासोबत सलमान खानचे खूप जुने नाते आहे.

सलमान खानने घेतली मीराबाई चानूची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल! पाहा नेमकं काय झालं...
सलमान खान-मीराबाई चानू
Follow us on

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची भेट घेतली. मीराबाई चानू यांनी देशासाठी रौप्य पदक जिंकले. सलमान खानने मीराबाई चानूची भेट घेतल्याचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर केल्यानंतर बॉलिवूडचा हा भाईजान सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये लोकांनी असे काहीतरी पाहिले, ज्यासोबत सलमान खानचे खूप जुने नाते आहे.

नेमकं काय झालं?

दबंग खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये मीराबाई चानू सलमान खानसोबत उभे राहून हसताना फोटो पोझ देत आहे. हा प्रतिमा शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, तुम्हाला शुभेच्छा… एक सुंदर भेट झाली… तुम्हाला खूप शुभेच्छा!’ शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खानच्या गळ्यात मणिपुरी स्कार्फ दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, पदक विजेत्या मीराबाई चानूने सलमानला हा मणिपुरी स्कार्फ भेट दिला असावा. त्या गिफ्ट म्हणून दिल्या गेलेल्या स्कार्फवर काळविटाची प्रिंट छापलेली दिसते. मग काय, लोकांनी भाईजानच्या या स्कार्फवर हरणाचे चित्र बघताच, त्यांनी कमेंट करून सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली.

पाहा पोस्ट :

काय म्हणाले नेटकरी?

काळवीटाने सलमान खानला किती त्रास दिला आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. एका वापरकर्त्याने याबद्दल बोलताना लिहिले की, ‘भाईजानच्या स्कार्फवर हरण.’ दुसऱ्याने लिहिले, ‘या छायाचित्रात काही दिसले का?’ तिसऱ्याने लिहिले, ‘अनेक मीम्स बनवल्या जातील, आता त्यांना पुन्हा जगणे कठीण होईल.’ दुसऱ्या एकाने लिहिले, ‘डेविलच्या मागे हरण, हरणाच्या मागे डेविल…. खूप मजा आली.’

भारताची प्रतीक्षा संपली!

वेटलिफ्टर मीराबाई यांच्या विजयाने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये पदकाची भारताची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांच्या कांस्यपदकानंतर त्याने भारतासाठी एकूण 202 किलो (87 किलो + 115 किलो) वजन उचलले होते.

मीराबाईंच्या आयुष्यावर चित्रपट येणार!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या जीवनावर मणिपुरी चित्रपट बनवला जाणार आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगपोक काचिंग गावात त्यांच्या निवासस्थानी शनिवारी चानू आणि इंफालच्या सौती फिल्म्स प्रॉडक्शन यांच्यात यासंदर्भात एक करार करण्यात आला. या कंपनीचे अध्यक्ष मनोब एमएम यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये डब देखील केला जाईल.

हेही वाचा :

अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून राज कुंद्रासोबतचा ‘तो’ फोटो शेअर

बॉलिवूड पदार्पणापूर्वी ‘या’ व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती सारा आली खान!